अमृतसरच्या गोल्डन टेम्पल बद्दलच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हांला माहित आहेत का? | Golden Temple History and facts in Marathi

अमृतसर शहाराच्या मध्यभागी स्थित, सुवर्ण मंदिर हा देशातील सर्वात प्रशंसनीय गुरुद्वारा आहे. श्री हरमंदिर साहिब नावाचे सुवर्ण मंदिर वैभव, समरसता आणि समानतेचे प्रतीक आहे. पंजाबच्या समृद्ध इतिहासात श्री हरमंदिर साहिबची अविभाज्य भूमिका आहे ज्यामुळे हा धार्मिक वारसा शिखांसाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र ठरते. तर या पवित्र स्थळाबद्दल अशा गोष्टी जाणून घेऊयात, ज्या खूप खास आहेत.

अमृतसरच्या गोल्डन टेम्पल बद्दलच्या ‘या’ खास गोष्टी तुम्हांला माहित आहेत का? | Golden Temple History and facts in Marathi

बुद्धांनी सुवर्ण मंदिराच्या पवित्र ठिकाणी ध्यान केले

भगवान तथागत गौतम बुद्ध सुवर्ण मंदिराच्या पवित्र ठिकाणी आल्याचे ऐतिहासिक नोंदी दर्शवतात. त्याकाळी, दाट जंगलांनी झाकलेला हा प्राचीन तलाव होता. बुद्धांना हे ठिकाण साधू आणि संतांसाठी ध्यान करण्यासाठी एक आदर्श स्थान असल्याचे आढळले. जीवनाच्या खऱ्या अर्थाच्या शोधात असताना, त्यांनी याच जागेची ध्यानासाठी एक दैवी जागा म्हणून निवड केली. आज ज्या ठिकाणी सुवर्णमंदिर उभे आहे त्याच ठिकाणी बुद्धाने ध्यान केल्याने हे ठिकाण खरोखरच एक दैवी आश्रयस्थान झाले आहे.

सुवर्ण मंदिराला 52 कशी सोन्याचे आवरण

आज पाहत असलेले सुवर्णमंदिर पहिल्यांदा बांधले तेव्हा एक इंचही सोन्याने मढवलेले नव्हते. 1762 मध्ये, हे धार्मिक वारसा स्थळ इस्लामिक शासकांनी नष्ट केले. तेव्हाच महाराजा रणजित सिंग, एक शूर शीख शासक यांनी संपूर्ण मंदिराची पुनर्बांधणी केली आणि संगमरवरी संरचनेत सोन्याचे चमकदार बाह्य आवरण लावले. ₹130 कोटी किंमतीचे 500 किलो शुद्ध 52 कशी सोन्याने मंदिराला लखलखीत केले. आणि तेव्हाच श्री हरमंदिर साहिबला अमृतसरचे सुवर्ण मंदिर म्हणून प्रसिद्धी मिळाली.

औषधी गुणधर्म असणारा पवित्र तलाव

सुवर्ण मंदिर अमृत सरोवर नावाच्या पवित्र तलावाने वेढलेले आहे. गुरू रामदास यांनी 1577 मध्ये बांधलेला कृत्रिम तलाव व त्याचं पाणी आपल्यातली आध्यात्मिकता उत्तेजित करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मंदिरात प्रार्थना करण्यापूर्वी भाविक सरोवराच्या पवित्र पाण्यात स्नान करतात. त्यांचा असा विश्वास आहे की पवित्र पाण्यात डुबकी मारून आध्यात्मिक ऊर्जा मिळू शकते. याशिवाय अमृत सरोवरात औषधी गुणधर्म असल्याचेही मानले जाते. त्यामुळे मंदिरात जाण्यापूर्वी येथे हात पाय धुण्याचा सल्ला दिला जातो.

चारही दिशांना चार प्रवेश द्वार

मंदिर उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेला असे चार प्रवेशद्वार बांधलेले आहेत. चार भिन्न प्रवेशद्वार स्वीकृती आणि मोकळेपणाने केल्या जाणाऱ्या स्वागताचे प्रतीक आहेत. अमृतसरचे सुवर्ण मंदिर लिंग, जात, पंथ किंवा धर्म विचारात न घेता प्रत्येकाचे स्वागत करते. देवाची अद्वितीय निर्मिती म्हणून आपण सर्वजण खरोखर धन्य आहोत याची अनुभूती घेण्यासाठी असे पवित्र दुसरे ठिकाण नाही. किंबहुना, सुवर्ण मंदिराला भेट देणाऱ्या यात्रेकरूंपैकी 35 टक्के हे बिगर शीख आहेत.

बाबा दीप सिंह यांचे बलिदान

बाबा दीप सिंग हे भारताच्या इतिहासातील सर्वात सन्माननीय हुतात्म्यांपैकी एक आहेत. त्यांनी श्री हरमंदिर साहिब येथे अखेरचा श्वास घेण्याची शपथ त्यांनी घेतली होती. 1757 मध्ये अमृतसरवर जहान खानाने आक्रमण केले तेव्हा बाबा दीप सिंह यांनी पाच हजार सैनिकांशी युद्ध केले. भयंकर युद्धादरम्यान त्याचे शीर धडा वेगळे झाले. तथापि, त्यांनी आपले डोके एका हाताने धरले आणि मंदिरात जाऊनच बाब दीप सिंहांनी आपले प्राणार्पण केले.

जगातील सर्वात मोठे अन्नदान

अमृतसर सुवर्ण मंदिरातील लंगर सेवा हे जगातील सर्वात मोठे मोफत अन्नदान केले जाणारे स्थान आहे. इथे दररोज पन्नास हजारांहून अधिक लोकांना जेवण दिले जाते. धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी तर ही संख्या एक लाख किंवा त्याहून अधिक होते. जेवण साधे पण रुचकर असते आणि त्यात रोट्या, डाळ, भाज्या आणि खीर यांचा समावेश असतो. विशेष म्हणजे येथे दिले जाणारे सर्व खाद्यपदार्थ हे भाविकांचे दान आहे. पाहून तोंडाचा ‘आ’ वासेल अशी सुवर्ण मंदिराची वास्तुकला, उत्तम आदरातिथ्य आणि मनमोहक शांतता या त्रयींचा इथे सुंदर मिलाप आहे. कृपेच्या आणि आध्यात्मिक मनःशांतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या जगाच्या कानाकोपऱ्यांतील भक्तांना बाबा हरमंदिर साहिब आकर्षित करते. चमकदार सोनेरी भिंती आणि सुंदर नक्षी असलेली ही भव्य रचना डोळ्यांचं पारणं फेडते. अमृत सरोवराच्या मधोमध उभे असल्याने अनेकदा असा भ्रम निर्माण होतो की प्रेक्षणीय सुवर्ण मंदिर पाण्यात तरंगत आहे. असं मनोहारी दृश्य पाहण्यासाठी एकदा तरी सुवर्ण मंदिराला भेट दिलीच पाहिजे.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

error: ओ शेठ