आले उन्हात शिजवून कडक उन्हात वाळवले की त्यापासून सुंठ (Ginger powder) तयार करता येते. औषधात सुंठेचा वापर होतो इतकेच काय तर रामनवमी, हनुमान जयंतीच्या दिवशीही सुंठवड्याचे महत्त्व फार असते.
सुंठ खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Ginger powder benefits in marathi
- ताकाच्या निवळीमध्ये सुंठ उगाळून वीस-पंचवीस दिवस असे पाणी घेतल्याने जुनाट ज्वर नाहीसा होतो.
- गूळ व सुंठ गरम करून पाण्यात कालवावा. त्याचे थेंब नाकात सोडल्याने उचकी लागणे बंद होते.
- सुंठेची पावडर ताकात घालून प्यायल्यास मूळव्याधीमध्ये फायदा होतो.
- आवळा, खडीसाखर व सुंठ यांचे चूर्ण सेवन केल्यास आम्लपित्त बरे होते.
- सुंठ, दालचिनी व खडीसाखर यांचा काढा करून प्यायल्याने सर्दी बरी होते.
- कावीळ झाली असता सुंठ व गूळ एकत्र करून खावा.
- गायीच्या दुधातून चमचाभर सुंठेचे चूर्ण घेतले असता लघवीवाटे होणारा रक्तस्राव थांबतो.
- खायचा सोडा, हिंग व सुंठचूर्ण कोमट पाण्याबरोबर घेतले असता सर्व प्रकारचा शूळ बरा होतो. तसेच एरंडमूळ व सुंठ उकळवून त्यात हिंग व सैंधव घालून प्यायल्याने वातविकारातून उठलेला शूळ बरा होतो.
- गायीच्या दुधात सुंठीचे चूर्ण घालून दिल्याने भांग प्यायल्याने येणारी नशा उतरते.
- सुंठ पाण्यात किंवा दुधात उगाळून त्याचा लेप कपाळावर लावल्यास अर्धशिशी बरी होते.
- सुंठ व वावडिंग एकत्र करून त्याचे चूर्ण मधात घालून खाल्ल्याने कृमी नाहीसे होतात.
- जुना गूळ व सुंठ यांचे चूर्ण रोज सकाळी घेतल्याने अपचन, अतिसार, वायूविकार यांमध्ये फायदा होतो.
- ताज्या ताकामध्ये सैंधव, जिरे व सुंठ यांचे मिश्रण घालून ते ताक जेवणानंतर प्यायल्याने अपचन, मलावरोध, आमातिसार यांमध्ये गुण येतो.
हे सुध्दा वाचा:– हळदीचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का?
- वाळा व सुंठ पाण्यात उकळवून ते पाणी प्यायल्यास जुलाब होणे बंद होते.
- सुंठ रुचकर, आमवात नाशक, पाचक, हलकी, उष्ण, तिखट अशी असून मलावरोधक, वायू-कफहारक आहे. उलटी, श्वास, पोटात वायू धरणे, पोटफुगी, खोकला, मूळव्याध, शूळ यांवर गुणकारी आहे मात्र पित्तप्रकोप असणाऱ्यांसाठी ती फारशी हितावह नाही.
- सुंठेचे चूर्ण करून त्यात गूळ (जुना) व थोडे तूप घालून त्याचे लाडू वळावेत. हे लाडू सकाळच्या वेळेस खाल्ल्याने वायू धरणे, सर्दी-पडसे आदी विकार ज्यांना नेहमी होत असतात त्यांना फायदेशीर ठरतात. त्यामुळे शरीरातील उत्साह व जोमही टिकून राहतो.
- किडलेल्या दाढेत सुंठ, तुरटी व ओवा यांचे चूर्ण करून भरले असता दाढदुखी थांब.
- सुंठ पाण्यात उगाळून त्याचा लेप शरीराच्या दुखऱ्या भागावर दिला असता फारच आराम मिळतो.
- सुंठ व ओवा गरम पाण्यातून घेतल्यास पोटातील वायू कमी होतो.. * सुंठीचे चूर्ण दह्यात घालून खाल्ले असता आमांशाचा त्रासही कमी होतो.
Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.