लसूण खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Garlic health benefits in marathi

मित्रांनो स्वयंपाकघरात लसणीची फोडणी देताना जो घमघमाट सुटतो त्याने भुकेलेल्या माणसाची भूक खवळून उठते. पदार्थांची रंगत, चव वाढवणारी लसूण नित्य परिचयाची आहे. औषधासाठीही लसणीचा उपयोग होतो. लसूण पांढऱ्या व लाल रंगामध्ये आढळते.

लसूण खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Garlic health benefits in marathi

 • लसुणाच्या पाकळ्या चमचाभर तुपामध्ये तळून जेवणापूर्वी खाल्ल्यास आमवात बरा होतो.
 • लसूण वाटून त्या लगद्यामध्ये हळद व गूळ घालून मुका मार बसलेल्या जागी त्याचा लेप लावल्यास फायदा होतो.
 • जखमेच्या व्रणाला कीड लागली असेल तर लसूण व मिरे वाटून त्यांचा जखमेवर लेप द्यावा.
 • लसूण बारीक वाटून कानशिलावर बांधल्यास अर्धशिशीवर उतार पडतो त्याचप्रमाणे लसणाचा रस नाकात घातल्याने अर्धशिशीवर फायदा मिळतो.
 • लसणीचा रस सतत तीन दिवस नियमितपणे चोळल्याने उष्णतेमुळे शरीरावर पसरलेले चट्टे बरे होतात.
 • जिरे, धने, मिरे, पुदिना, सैंधव व लसूण बारकी वाटून घ्यावेत. ही चटणी खाल्ल्याने वाढलेला रक्तदाब आटोक्यात येतो.
 • लसुणाच्या पाकळ्या थोड्या चेचून तेलात घालाव्यात व तेल कडकडीत गरम करावे. तेल कोमट झाल्यावर त्याचे थेंब कानात घातल्याने कान दुखणे, कान पिकणे यावर गुण येतो.
 • लहान मुलांचा डांग्याखोकला बरा होण्यासाठी लसुणाच्या पाकळ्या वाटून त्याची पुरचुंडी करून त्याचा वारंवार वास घ्यावा, वारंवार पुरचुंडीस हुंगावे.
 • लसणाच्या पाकळ्या बारीक वाटाव्या व त्यांचा लगदा एका कापडाच्या
 • पट्टीवर पसरावा. तळपायांना तेल लावून ती पट्टी तळपायांना बांधावी. सकाळ- संध्याकाळ अशा पट्ट्या लावल्याने फायदा होतो.
 • लसूण वाटून तिळाच्या तेलात घालून खाल्ल्याने पोट फुगणे, वायुविकार आदी विकार बरे होतात.
 • लसूण, खडीसाखर व सैंधव समप्रमाणात घ्यावे. हे मिश्रण चांगले वाटून त्यात गाईचे दुप्पट तूप घालून केलेले चाटण घेतल्याने. अजीर्ण, पोटात दुखणे, मंदाग्नी, खोकला, संधिवात यांमध्ये फायदा होतो.
 • अरुची व अपचन झाले असता लसूण, मनुका, सैंधव, साखर व कोथिंबिरीची चटणी करून खावी.
 • लसूण उष्ण, तिखट, तीक्ष्ण, पौष्टिक, वीर्यवर्धक, स्निग्ध, गरम व पाचक असते. * हाडास दुखापत झाली असता लसणाचे सेवन करावे.

हे सुध्दा वाचा: काळे व पांढरे मिरे खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

 • वायूमुळे पोटात दुखत असल्यास लसूण वाटून तुपात कालवावी व त्यावर गरम पाणी प्यावे. फायदा होतो.
 • चेहऱ्यावर तजेला येण्यासाठी लसणीचे सेवन करावे. दररोज लसणीचे सेवन केले असता मलावरोध दूर होतो व शौचालाही साफ होते.
 • शरीरात चमक, उसण भरल्यास किंवा कळा मारत असल्यास लसणीच्या रसामध्ये हिंग घालून दुखऱ्या भागावर चोळला असता गुण येतो.
 • उचकी लागली असता लसूण खाल्ल्याने थांबते. लहान मुलांना नेहमी लसूण दिल्याने पोटातील जंत कमी होतात.
 • लसूण ठेचून कापसात गुंडाळून दाढेखाली ठेवल्यास दाढदुखी बंद होते.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button