‘ही’ आहेत बुद्धिमान माणसांची 5 लक्षणे | 5 signs of a highly intelligent person

आपल्या बुद्धीचा सर्वतोपरी, वापर करणाऱ्या लोकांना बुद्धिमान म्हणून ओळखले जाते. पण आपल्या आजुबाजुला असलेल्या बुद्धिमान लोकांना कसे ओळखावे, बुद्धिमान माणसांची लक्षणे कोणती हे जाणून घेऊया आजच्या पोस्ट मध्ये.

‘ही’ आहेत बुद्धिमान माणसांची 5 लक्षणे | 5 signs of a highly intelligent person

1. बुद्धिमान लोक नेहमी काही ना काही शिकतात (They always learn something)

बुद्धिमान लोकांचा नेहमी नवीन नवीन गोष्टी शिकण्याकडे अधिक कल असतो. ज्ञान मिळवणे आवश्यक आहे यांची त्यांना पक्की जाण असल्याने ते त्यासाठी जिद्दी असतात. नवीन नवीन गोष्टी ते सतत शिकत राहिल्याने त्यांच्या बुद्धीत भर पडते. नवविचारांना चालना मिळते. इतकंच काय पुढील भविष्याच्या दृष्टीने गुंतवणूक, योजना यांचा विचार ते करतात. वॉरन बफे, एलोन मस्क, स्वामी विवेकानंद हे सर्व बुद्धिमान आणि संवेदनशील लोक आहेत ज्यांनी नवीन गोष्टी शिकण्याला महत्त्व दिले होते.

2. बुद्धिमान माणूस विचार करून बोलतो. (Think and speak)

आपल्या आयुष्यात उद्भवणाऱ्या बऱ्याचशा अडचणी या विचार करून न बोलल्यानेच येतात. जो माणूस विचार न करता पटकन बोलून जातो तो गोत्यात अडकतो. विचार करून, नीट समजून उमजून बोलण्याची सवय ही आपल्या करिअर, नातेसंबंध आणि एकूणच व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने खूप महत्वाची बाब आहे. हीच गोष्ट बुद्धिमान माणसांमध्ये प्रकर्षाने जाणवते. जे आपण बोलतोय त्याने कोणी दुःखी होणार नाही, त्याला राग येणार नाही, तो चिडणार नाही याची काळजी बुद्धिमान माणसं घेतात आणि म्हणून त्यांचे संबंध इतरांसोबत चांगले असतात.

3. खुला विचार करतात. (Broad minded Thinking)

बुद्धिमान लोक केवळ एकच बाजूने गोष्टींचा विचार करत नाहीत तर सर्व बाजूने त्या गोष्टी ते उत्तमरित्या पडताळून पाहतात. काय योग्य, अयोग्य, चांगले, वाईट यांचा दृष्टीकोन समोर ठेवूनच ते काम करतात. कोणत्याही गोष्टीवर बोलायचे असल्यास किंवा विचार हवा असल्यास संकुचित विचारसरणी ठेवणे ते टाळतात. खुलेपणाने विचार केल्याने प्रत्येक गोष्टीची बाजू समोर येते. खुले विचार ठेवल्याने वस्तुस्थितीचा विचार करून निर्णय घेण्याची सवय तर लागतेच पण आहे त्या परिस्थितीला स्वीकारून ते मार्ग देखील काढतात.

4. बुद्धिमान माणसे स्वतःशी बोलतात (Self Talk)

स्वतःशी एकट्यातच बडबड करण्याला अनेक लोक वेडे समजतात. पण स्वतःशी बोलणे हे बुद्धिमान माणसाचे लक्षण आहे. जेव्हा आपण स्वतःशी बोलतो तेव्हा आपल्या आयुष्यात काय चालू आहे हे नेमके माहिती असते. ज्यांचे स्वतःच्या आयुष्यावर लक्ष आहे तोच माणूस यशस्वी होत असतो. स्वतःशी बोलल्याने आपल्याला आपल्या क्षमता, उणीवा या समजतात. पुढे जाऊन आपल्याला काय करायचे आहे, आत्ता आपण काय करत आहोत हे सगळे स्वतःशी बोलल्यावर समजते. बुद्धिमान माणसे जिद्दी असतात. ते नेहमी स्वत:ला अव्वल बनवण्यासाठी स्वत:लाच तल्लख करत असतात. यासाठी स्वत:शी बोलण्याचा खूप फायदा होतो. मुख्य म्हणजे आपली बुद्धी शाबूत राहण्याला मदत होते.

5. पुस्तके वाचतात, अधिक जाणून घेण्याची इच्छा असते. (Read books and be more curious)

बुद्धिमान माणसांची शिदोरी म्हणजे नवनवीन गोष्टी, माहिती, अनुभव या सगळ्यांची पुस्तके असतात. माहितीचा प्रचंड स्त्रोत पुस्तकात असतो. शिवाय बुद्धिमान लोकांकडे असलेली जिज्ञासू वृत्ती त्यांना पुस्तकं वाचायला भाग पाडते. पुस्तक वाचनातून मिळणाऱ्या नवनवीन माहिती मुळे विचारांना चालना मिळते. सारासार विचार, सारासार विवेकबुद्धी वापरून गोष्टी कशा हाताळायच्या याचे ज्ञान पुस्तकातून मिळते. अशा बुद्धिमान माणसांचे जास्त मित्र सुद्धा नसतात. पुस्तकांनाच आपला मित्र मानून ते नव्या विचारांशी सतत मैत्री जोडणे पसंद करतात.

बुद्धिमान व्यक्तींच्या यादीत तुम्हालाही आता बसायचे असल्यास ही पाच लक्षणे तुमच्यात सुद्धा दिसतील यासाठी प्रयत्न करायला लागा. केवळ ही पाचच लक्षणे व्यक्तीला बुद्धिमान ठरवतात असे नाही तर आपल्या आवडीला प्राधान्य देणारे, धैर्य आणि संवेदनशीलता असणारे लोक सुद्धा बुद्धिमान मानले जातात. तेव्हा ही सगळी लक्षणे आत्मसात करा आणि बुद्धिमान व्हा. यावर तुमचं मत काय हे सुद्धा कमेंट करून सांगा.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat (GK_dnyan) वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button