अंजिरामध्ये ‘ए’ जीवनसत्त्व असते तसेच ते बलकारकही असते. आरोग्यदायी व रक्तवर्धक असे अंजीर दुधामध्ये उकळून खाल्ल्याने बल व रक्त यांची वाढ होते.
अंजीर खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Fig fruit benefits in marathi
- एक सुके अंजीर व चार-पाच बदाम गरम दुधात उकळून प्याल्याने रक्तशुद्धी होऊन उष्णतेचे विकार नाहीसे होतात. उदरशुद्धी व शरीरवृद्धी होते.
- अंजीर पाण्यात उकळून गळवांवर बांधले असता गळू लवकर पिकते.
- अंजीर पाण्यात उकळून त्याचा बाहेरील बाजूने लेप लावला असता घशाच्या आतील भागाला आलेली सूज दूर होते.
- अंजीर पचनास जड़ परंतु पित्त, रक्त व वायू हे विकार दूर करणारे असते. कोरड्या खोकल्यामध्ये अंजिराचा उपयोग होतो. सुक्या अंजिरात उपयुक्त जीवनसत्त्वे व क्षार असल्याने भुकेचे प्रमाण वाढते. जठराचे विकार दूर होतात. श्रमविकारही होतात.
हे सुध्दा वाचा:– सीताफळ खाण्याचे फायदे तुम्हाला माहित?
- धातुवृद्धी व रक्तवृद्धीसाठी अंजिराचा उपयोग होतो.
- अंजिरे पचावयास अतिशय जड असल्याने खाण्यापूर्वी दोन-तीन तास पाण्यात भिजत ठेवावी व मग नीट चावून चावून खावीत.
- अंजिराच्या अतिरिक्त व अमर्याद सेवनामुळे पोटदुखीचा त्रास होतो. तसेच पोटात कळ येऊन मुरडा होतो आणि यकृत व आमाशयाची सुद्धा हानी होते यास्तव आपली पचनशक्ती लक्षात घेऊनच आपण अंजिराचा आहारात वापर करावा.
Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.