अत्यंत सुवासिक व देखण्या अशा बडीशेपेच्या रोपाला येणाऱ्या तुऱ्यांना पिवळी फुले येतात. या फुलांमध्येच बडीशेपेचे दाणे असतात. आपल्याकडे मुखशुद्धीसाठी या बडीशेपेचा (Fennel seeds) वापर केला जातो.
बडीशेप खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Fennel seeds benefits in marathi
- उष्णप्रकृती असणाऱ्यांना उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होतो. अशांनी रात्री बडीशेप पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी प्यावे, कोठ्यामधील उष्णता नाहीशी होते.
- बडीशेपेची पुरचुंडी पाण्यात ठेवून ते पाणी आजारी माणसाला प्यायला देणे गुणकारी ठरते.
- पित्तज्वर बरा होण्यासाठी बडीशेप पाण्यात उकळावी व साखर घालून प्यावी.
- अर्धा किलो बडीशेप अर्ध्या लीटर पाण्यात चार-पाच तास भिजवून नंतर हे पाणी थोडे उकळून घ्यावे, गाळून घ्यावे व त्यात पुन्हा चारशे ग्राम साखर घालून घट्ट सरबत बनवावे. उष्णतेचा त्रास होणाऱ्यांनी हे सरबत घेतले असता फायदा होतो.
- बडीशेप, आवळासार गंधक, ज्येष्ठमध 100 ग्रॅम, यात सोनामुखी 25- 30 ग्रॅम घालावी तसेच 60-70 ग्रॅम साखर घालून हे मिश्रण चांगले वस्त्रगाळ बारीक करावे. झोपताना गरम पाण्याबरोबर हे चूर्ण घेतले असता मलावरोध, मुरडा, अतिरिक्त उष्णता, रक्तविकार आदी विकार दूर होतात.
- उष्णतेचा खोकला झाला असता बडीशेप व खडीसाखरेचे चूर्ण तोंडात ठेवून त्याचा वारंवार रस घ्यावा.
- आमातिसाराचा त्रास होत असल्यास बडीशेपेचा काढा करून प्यावा किंवा सुंठ व बडीशेप गरम करून त्याचे चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्यावे.
हे सुध्दा वाचा:– तिरफळ खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?
- अपचनाचा त्रास होत असल्यास बडीशेप चावून खावी.
- बडीशेपेचा अर्क घेतल्याने पचन होते. तापाने येणाऱ्या उलट्या बऱ्या होतात. शोष कमी होतो.
- बडीशेपेचा काढा साखरेतून घेतल्यास उलटी होणे बंद होते.
- बडीशेप भाजून त्यात लिंबाचा रस घालून व मीठ लावून ठेवावी व जेवणानंतर खावी. असे केल्याने मुखशुद्धीही होते व अन्नाचे पचनही होते.
- पित्त झाल्यास धने व बडीशेप पाण्यात भिजवून कुसकरावी व ते पाणी गाळून खडीसाखरेबरोबर प्यावे.
- बडीशेप (Fennel seeds) व पुदिना पाण्यात उकळवून त्यांचा काढा घेतल्यास हातपाय दुखणे, पायात गोळे येणे यांवर फायदा होतो.
- बडीशेपेचा काढा तुपातून घेतल्यास अतिसार बंद होतो.
- बडीशेपेच्या काढ्याच्या सेवनामुळे लघवी साफ होते.
Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.