जपान देशाबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का? | Facts about Japan in Marathi

जपान (japan) हा देश सुमारे 6800 बेटांपासून बनला आहे. विशेष म्हणजे जपान हा देश सर्वात कष्टकरी देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जपान या देशाचे नाव कुठल्याही क्षेत्रात मागे नाही. जपान देशातील नागरिक कुठलीही नवीन गोष्ट करण्यास नेहमी तात्परतेने पुढाकार घेतात व यातून ते आपले मेहनतीची ओळख जगाला करून देतात.

जपान देशाबद्दल काही आश्चर्यकारक माहिती? | Amazing facts about japan in marathi

  • जपान जगातील एकमेव असा देश आहे, ज्याच्यावर ॲटम बॉम्बचा हल्ला झालेला आहे. या देशावर अमेरिकन 6 आणि 9 ऑगस्ट 1945 या दिवशी हिरोशिमा व नागासाकी या शहरावर बॉम्ब हल्ला केला होता. या बॉम्बचे नाव लिटल बॉय आणि फेट मॅन असे होते.
  • जगाच्या पाठीवर जपान जगातील सर्वात मोठा ऑटोमोबाईल बनवणारा देश आहे.
  • जपान या देशात काळी मांजर भाग्यवान समजली जाते.
  • येणाऱ्या प्रत्येक नव वर्षाला म्हणजे 1 जानेवारीला जपानच्या मंदिरात 108 वेळा घंटा वाजवून नववर्षाचा उत्सव साजरा केला जातो.
  • जपान या देशात दरवर्षी सर्वाधिक भूकंप होतात तरीदेखील जपान हा जगातील दुसऱ्या क्रमांकाची बळकट आर्थिक स्थिती असलेला देश आहे.
  • जपान या देशात कोणत्याही विद्यापीठात अरबी किंवा इतर कोणतेही इस्लामिक भाषा शिकवली जात नाही.
  • जपान देशात प्रकाशित झालेली 20 टक्के पुस्तके कॉमिक बुक्स आहेत.
  • जपान या देशात बेसबॉल व सुमो रेसलिंग हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे.

हे सुध्दा वाचा:- रॉयल एन्फिल्ड बद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का?

  • जपान (Japan) या देशात दरवर्षी सुमारे 1500 भूकंप येतात. म्हणजे दिवसाला चार भूकंप या देशात येतात.
  • या देशात शाळेतील मुले आणि शिक्षक एकत्र येऊन आपापले वर्ग स्वच्छ करतात.
  • जपान या देशात सॉरी म्हणण्याचे वीस पेक्षा जास्त प्रकार आहेत.
  • 2011 साली जपान मध्ये झालेला भूकंप हा आजपर्यंतचा सर्वात भयानक आणि जलद भूकंप होता.
  • या देशातील नागरिकाचे सरासरी जगण्याचे वय 82 वर्ष आहे. तसेच जपानमध्ये शंभर वर्षापेक्षा अधिक वय असलेले 50 हजार पेक्षा जास्त लोक आहेत.
  • जपान या देशात मुले दहा वर्षांची होईपर्यंत त्या मुलांना कुठलीही परीक्षा देण्याची गरज नाही.

Note – मित्रांनो असेच रोचक आणि एज्युकेशनल माहितीसाठी तूम्ही आपल्या Facebook, Instagram आणि YouTube चॅनलला नक्की भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *