वकील काळा कोर्ट का घालतात? त्या मागचा इतिहास आहे? | Do You Know Why Lawyers Wear Black Robes?

मित्रांनो, या जगामधील प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण नक्कीच दडलेलं असतं. असंच काहीसं वकिलांच्या काळ्या कोटामागे एक कारण दडलेलं आहे. प्रसंगानुरूप कपडे घालायचे असतात, अशी एक म्हण आहे आणि जेव्हा एखाद्या व्यवसायाचा विचार केला जातो तेव्हा त्या व्यवसायानुसार ड्रेस कोड परिधान करणं आवश्यक आहे. वेगवेगळ्या व्यवसायांचे वेगवेगळे ड्रेस कोड असतात.

कपडे नेहमीच तुमच्या अस्तित्वाची ओळख करून देत असतात. ड्रेस कोडवरूनही संबंधित व्यक्तीची ओळख पटत असते. जसं की, डॉक्टर पांढऱ्या रंगाचे ऍप्रन घालतात, स्थापत्य अभियंते पिवळे हेल्मेट घालतात, तसेच वकील नेहमी काळ्या रंगाचा कोट घालतात. वास्तविक जीवनामध्ये असो किंवा चित्रपटामध्ये, तुम्ही नेहमीच काळ्या कोट आणि पांढऱ्या शर्टमध्ये वकील पाहिले असतील. आपल्या देशात उन्हाळा असो वा थंडी प्रत्येक ऋतूत वकील आणि न्यायाधीश काळा कोटच घालतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की वकील काळा कोट का घालतात? वकिलांनी घातलेला काळा कोट ही फॅशन नसून त्यामागे एक ऐतिहासिक कारण आहे.

वकील काळा कोर्ट का घालतात? त्या मागचा इतिहास आहे? | Do You Know Why Lawyers Wear Black Robes?

वकिलीचा व्यवसाय करताना काळे कपडे घातले जातात. खरं तर वकिलांनी काळा कोट घालण्याची परंपरा इंग्लंडपासून सुरू झाली. भारतीय न्यायव्यवस्था ही ब्रिटीश व्यवस्थेतून चालत आलेली आहे. त्यामुळे भारतीय न्यायालयांमध्ये वकिलांनी काळा कोट घालण्याची प्रथा अजूनही सुरू आहे. वकिलांनी काळा कोट घालण्याची परंपरा इंग्लंडमध्ये उगम पावल्याचे मानले जाते. ब्रिटनची राणी मेरी 1694 मध्ये मरण पावली, त्यानंतर त्यांचे पती किंग विल्यम्स यांनी सर्व न्यायाधीश आणि वकिलांना सार्वजनिक शोक व्यक्त करण्यासाठी काळ्या गाऊनमध्ये एकत्र येण्याचे आदेश दिले. हा आदेश कधीही रद्द करण्यात आला नाही, ज्यामुळे वकिलांनी काळा गाऊन परिधान करण्याची प्रथा तेव्हापासून सुरू केली. त्यानंतर 1865 मध्ये, इंग्लंडच्या राजघराण्याने राजा चार्ल्स दुसरा याच्या मृत्यूवर काळे कपडे घालण्याचा आदेश कोर्टाला दिला, त्यानंतर कोर्टात काळा कोट घालण्याची प्रथा सुरू झाली.

काळ्या वस्त्रांची परंपरा ब्रिटीशांमध्ये प्रसिद्ध झाली आणि नंतर जगभर पसरली. इंग्लंड मधल्या हवामानामुळे ही परंपरा ब्रिटनमध्येही प्रसिद्ध होती. ब्रिटिशांनी हवामानाचा कोणताही विचार न करता त्यांनी राज्य केलेल्या भूमीवर त्यांच्या संस्कृती आणि प्रथा लादल्या. त्यांनी राज्य केलेले देश अजूनही समान पोशाख आणि कायद्यांचे पालन करतात आणि भारतातील न्याय व्यवस्था याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. मात्र, आजच्या काळात काळा कोट ही वकिलांची ओळख बनली आहे. भारतीय न्यायव्यवस्थेत अनेक गोष्टी आहेत ज्या ब्रिटीशांच्या काळापासून चालत आल्या आहेत. त्यामुळे आजही काळ्या रंगाचे कोर्ट वकील परिधान करतात.

जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा संविधान बनल्यानंतर, 1961 साली, आपल्या न्यायाधीश आणि वकिलांसाठी एक नियम बनवला गेला. या1961 च्या कायद्या नुसार, कोर्टात पांढऱ्या बँड टायसह काळा कोट घालणं बंधनकारक करण्यात आलं होतं, भारतात वकिलांसाठी काळा कोट अनिवार्य करण्यात आला होता. काळा कोट शिस्तीचा, आत्मविश्वासाचा प्रतिक मानला जातो. काळा कोट घालण्यामागचा असा विश्वास आहे की, हा काळा कोट आणि पांढरा शर्ट वकिलांमध्ये शिस्त आणतो आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास निर्माण करतो.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

error: ओ शेठ