ज्या व्यक्तीकडे नोकरी आहे सहाजिकच त्याच्याकडे सॅलरी अकाउंट असते. त्या सॅलरी अकाउंट मध्ये त्या व्यक्तीचा कंपनीकडून होणारा पगार जमा केला जातो. कंपनीच्या सांगण्यावरून हे खाते उघडले जाते. आता आपण सॅलरी अकाउंट आणि सेविंग अकाउंट वेगळे कसे काय आणि या दोघांमध्ये काय फरक आहे. असा प्रश्न निर्माण झाला आहे तर चला आपण जाणून घेऊया या पोस्टमध्ये सेविंग अकाउंट अर्थात (बचत खाते) आणि सॅलरी अकाउंट अर्थात (पगार खाते) यातील फरक काय आहे. आणि विशेष म्हणजे या दोन्ही खात्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊयात.
सेविंग आणि सॅलरी खाते या दोन्ही अकाउंट मधील फरक तुम्हाला माहित आहे का? |Difference between savings account and salary account
सॅलरी बँक अकाउंट (Salary account ) म्हणजे काय?
सॅलरी बँक अकाउंट हे कंपन्यांच्या सांगण्यावरून उघडले जाते. तसेच संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याची वेतन खाते मिळते. विशेष म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याला वैयक्तिक सॅलरी अकाउंट मिळते. जिथे त्या व्यक्तीचा पगार दर महिन्याला जमा होतो.
सेविंग बँक अकाउंट (Savings account) म्हणजे काय?
कोणतीही व्यक्ती सेविंग बँक अकाउंट अर्थात बचत खाते उघडू शकते. सामान्यतः जे लोक पगारदार नसतात ते दैनंदिन जीवनात त्यांचे आर्थिक नियोजन करण्यासाठी बचत खाते उघडतात. या आर्थिक नियोजन मधून त्यांना व्याज कमवणारे जमा खाते मिळते.
आता आपण सॅलरी अकाउंट व सेविंग अकाउंट यामधील फरक जाणून घेतला आता आपण या दोन्ही अकाउंट चे फायदे जाणून घेऊयात.
हे सुध्दा वाचा – आरोग्य विमा काढण्याचे आहेत ‘हे’ फायदे
सेविंग अकाउंटचे फायदे
- आपण बँकेत जमा केलेले आपले भांडवल पाच लाखा रुपयापर्यंत कव्हर केले जाते. यामध्ये चालू खाते, बचत खाते आणि मुदत ठेवीचा समावेश आहे.
- सर्व सरकार मान्य आणि खाजगी बँका त्यांच्या बचत खात्यावर हवाई अपघातांसह आयुर्विमा संरक्षण देत आहेत. तसेच यामध्ये काही बँका ते अगदी मोफत देतात.
- अनेक नामांकित बँका आपल्या बचत खातेधारकांना अमर्यादित एटीएम काढण्याची सुविधा देतात. मात्र यामध्ये इतर अनेक बँका या सेवा केवळ त्यांच्या प्रीमियम ग्राहकांना देतात.
- देशातील अनेक नामांकित बँका अर्थात यामधील एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, ॲक्सिस आणि आयडीएफसी फर्स्ट सारख्या बँका त्यांच्या प्रीमियम बचत खातेधारकांना एअरपोर्ट लाउज ॲक्सेस मोफत देतात.
सॅलरी अकाउंटचे फायदे
- जर तुमची सॅलरी अकाउंट असेल तर पर्सनल चेक बुक तुम्हाला मिळते.
- पगार खातेधारकांचा मृत्यू झालास 20 लाख रुपयांपर्यंतचा वैयक्तिक अपघात विमा मिळतो.
- सॅलरी अकाउंट मधील पगाराच्या खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याचा कोणताही नियम नाही.
- 3 महिने पगाराच्या खात्यात पगार नसेल तर तो वेतन खात्यातून सर्वसाधारण खात्यात बदलून दिला जातो.
Note – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat (GK_dnyan) वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.