कर वसुली आणि कर संकलन योग्यरीत्या व्यवस्थित केले जावे यासाठी प्राप्तिकर विभागाकडून प्रत्येकाला टॅन आणि पॅन कार्ड क्रमांक दिला जातो.
पॅन कार्डबद्दल आपल्यातील अनेकांना माहिती आहे पण आज आम्ही तुम्हाला टॅन कार्डबद्दल सांगणार आहोत. टॅन कार्डचे नाव ऐकून तुम्ही विचारात पडला असाल की हे नेमक काय आहे? त्यामुळे अनेक लोक पॅन आणि टॅन कार्ड मध्ये बुचकाळ्यात पडतात त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, पॅन कार्डपेक्षा टॅन कार्ड किती प्रमाणात वेगळे आहे? तसेच ते कुठे वापरले जाते तसे ते कोण जारी करते?
PAN card आणि TAN card मधला फरक तुम्हाला माहित आहे का? | Difference between pan card and tan card in marathi
टॅन कार्डचा फुल फॉर्म ( Tax Deduction and collection account number) हा असतो. असेच TAN card हे प्राप्तिकर विभागाकडून जारी करण्यात येते. तसेच हा 10 अंकी अल्फान्यूमेरिक कोड आहे. कर कपात करणाऱ्या किंवा वसूल करणाऱ्या सर्वांसाठी हे बंधनकारक आहे. टॅन वापरणे खूप महत्त्वाचे देखील आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पॅन करदात्यांसाठी बनवले जातो.
TAN card हे कर कपात करणाऱ्यांसाठी बनवला जातो. जे लोक कोणत्याही कामाच्या मोबदल्यात पैसा देतात तर कर कापून पैसे देण्याची जबाबदारी त्या लोकांची आहे. तसेच तुमची कंपनी या श्रेणीत येते. हे लोक किंवा कर कपात करणाऱ्या कंपन्यांना TAN बनवावा लागेल.
जर तुम्हाला TAN साठी Apply करायचं असेल तर तुम्ही फॉर्म 49B द्वारे ऑनलाईन किंवा ऑफलाइन TAN कार्ड साठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला 62 रुपये मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे हे पेमेंट क्रेडिट कार्ड, डिमांड ड्राफ्ट, चेक किंवा नेट बँकिंग द्वारे केले जाऊ शकते. जर हेच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे असेल तर तुम्ही त्यासाठी NSDLच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकता.
हे सुध्दा वाचा:- ग्राहकाच्या अधिकाराबद्दल तुम्हाला माहित आहे का?
Permanent account number हा 10 अंकी कोड असतो. तसेच तो प्राप्तिकर विभागाकडून जारी करण्यात येतो. विशेष म्हणजे सर्वसाधारणपणे नोकरदार लोकांना याची गरज असते. कार्डधारकांमार्फत होणाऱ्या देवाण-घेवाणीवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारकडून हे जाहीर केले जाते.
PAN म्हणजे permanent account number तर TAN म्हणजे tax deduction account number ज्याचा कर कापला जातो किंवा जमा केला जातो. त्या व्यक्तीकडे TAN क्रमांक असणे आवश्यक आहे. टीडीएसशी संबंधित सर्व कागदपतत्रासाठी आणि आयकर विभागाकडून टीडीएसशी संबंधित सर्व प्रकारासाठी TAN क्रमांक देणे अर्थात नमूद करणे आवश्यक आहे.
Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.