कुंभमेळा आपल्या भारतातील सर्वात मोठा मेळा असतो हे आपल्या सर्वांना माहीतच असेलच. खरे तर, हा देखील तीन प्रकारचा आहे. त्यामध्ये अर्ध कुंभ, पूर्ण कुंभ आणि महा कुंभ असे प्रकार आहेत. आता पाहूयात या पूर्ण कुंभ, अर्धकुंभ महा कुंभ मध्ये नेमके अंतर काय किंवा यांचा अर्थ काय? ( Difference between kumbh mahakumbh purna kumbh ardh kumbh in marathi)
महाकुंभ, पूर्णकुंभ, अर्धकुंभ आणि कुंभ म्हणजे नेमके काय? | Difference between kumbh mahakumbh purna kumbh ardh kumbh in marathi
सध्या महा कुंभ 13 जानेवारी 2025 पासून ते 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत होणार आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश मधील प्रयागराज जिल्ह्यामध्ये या महा कुंभमेळ्याची तयारी सुरू आहे. या वेळेचा महा कुंभमेळा हा खूप मोठ्या स्तरावरती होणार असून यामध्ये करोडो श्रद्धाळू यात भाग घेणार आहेत आणि संगम तटावर म्हणजेच गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या या संगमावर धार्मिक, म्हणजेच शाही स्नान करण्यासाठी असंख्य भाविक हजेरी लावणार आहेत.
खरे तर अर्ध कुंभ, पूर्ण कुंभ आणि महा कुंभ हे तिन्ही मेळे वेगवेगळ्या वेळेत आणि वेगवेगळ्या वर्षी होतात.
कुंभमेळा म्हणजे काय?
कुंभमेळ्याचे आयोजन भारतामध्ये चार ठिकाणी केले जाते. त्यामध्ये हरिद्वार, नाशिक, प्रयागराज आणि उज्जैन हे ठिकाणे आहेत. इथे गंगा, गोदावरी, शिप्रा, नदीच्या पाण्यात भाविक अंघोळ करतात. प्रयागराज मध्ये संगम तटावरती जाऊन श्रद्धाळू स्नान करतात. हे स्नान म्हणजेच शाही स्नान होय.
अर्ध कुंभमेळा म्हणजे काय?
अर्ध कुंभमेळ्याचे आयोजन प्रत्येक सहा वर्षातून केले जाते. हा मेळा फक्त प्रयागराज आणि हरिद्वार मध्ये होतो. या मेळयासाठी देखील करोडोच्या संख्येमध्ये भाविक येतात.
हे सुद्धा वाचा:– भारतात शून्याचा शोध कधी आणि कसा लागला? तुम्हाला माहीत आहे का?
पूर्ण कुंभमेळा म्हणजे काय?
पूर्ण कुंभमेळा बारा वर्षातून एकदाच केला जातो. हा मेळा प्रयागराज, नाशिक, उज्जैन आणि हरिद्वार या चार ठिकाणांपैकी एका ठिकाणी या मेळ्याचे आयोजन केले जाते. आता यावर्षी 2025 मध्ये पूर्ण कुंभमेळा होणार आहे. खरे तर यावर्षीच्या या पूर्ण कुंभमेळ्याला महा कुंभ असे नाव दिले गेले आहे.
Note- मित्रांनो तुम्हाला (Difference between kumbh mahakumbh purna kumbh ardh kumbh in marathi) ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.