दिसायला अत्यंत आकर्षक असे हे फळ स्वभावतः अत्यंत मधुर आणि चविष्ट असते. सीताफळ (Custard apple) फोडून आतला मांसल गर खाण्यात येतो. अत्यंत थंड असे हे फळ आरोग्याच्या दृष्टीनेही फार उपयोगी असते.
सीताफळ खाण्याचे फायदे तुम्हाला माहित? | Custard apple benefits in marathi
- सीताफळ (Sugar-apple) थंड, मधुर, पित्त-तृषाशामक, वातूळ, कफकारक व उलटी बंद करणारे असते.
- सीताफळ बलवर्धक असल्याने ज्यांना अशक्तपणा व थकवा आला असेल त्यांनी याचे सेवन केले असता फायदा होतो.
- दीर्घ आजारानंतर येणारा अशक्तपणा तसेच हृदयाच्या मांसपेशींना दुर्बलपणा आला असता सीताफळाचे सेवन करावे.
- कच्चे सीताफळ मुरड्यावर फायदा करते. याच्या बियांचे चूर्ण केसांना लावल्याने केसातील उवा नाहीशा होतात. मात्र या बियांचे चूर्ण डोळ्यात गेल्याने डोळ्यांची आग होते त्यामुळे याचा वापर जपून करावा.
हे सुध्दा वाचा:– पपई खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?
- सीताफळाची पाने वाटून त्याचे पोटीस गळवांवर बांधल्यामुळे गळू लवकर पिकते. तसेच आतली जखमही स्वच्छ होण्यास मदत होते.
- सीताफळ अत्यंत थंड असल्याने त्याचे अतिरेकी सेवन केल्याने थंडी वाजून ताप येतो. तसेच ज्यांना अपचनाचा त्रास असेल, ज्यांना सर्दी झाली असेल अशांनी सीताफळाचे सेवन जपून करावे.
Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.