जिन्यामुळे पदार्थाला एक वेगळ्या प्रकारचा स्वादिष्ट व रुचकरपणा येतो. सफेद, काळे (शहाजिरे) व कलौजी असे जिऱ्याचे तीन प्रकार आहेत. जिरे (Cumin) थंड असते.
जिरे खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Cumin benefits in marathi
- जिरे रुक्ष, तिखट, हलके, अग्नी प्रदीप्त करणारे असून कफनाशक, पित्तशामक, रुचिकारक, बुद्धिवर्धक असतात. वायू धरणे, उलटी होणे, अतिसार, पोटात गोळा उठणे, पोट फुगणे व जुलाब यांमध्ये जिऱ्याचा फायदा होतो.
- जिरे भाजून त्याचे चूर्ण करावे व त्यात मिरे वाटून घालावे. ह्या दोहोंचे चूर्ण एकत्र करून ताज्या ताकात घालून त्यात थोडे सैंधव घालावे. अतिसार, मूळव्याध, संग्रहणी यांमध्ये हे ताक प्यायल्याने फायदा होतो..
- धने व जिरे यांचे चूर्ण करून पाण्यातून घ्यावे. त्यात थोडी साखर मिसळून घेतल्याने छातीत जळजळणे, पित्ताचे विकार दूर होतात.
- जिरे व सैंधव समप्रमाणात घेऊन लिंबाच्या रसामध्ये सात दिवस भिजवून सुकवावे. सकाळ संध्याकाळ हे चूर्ण घेतल्याने अपचन, वायूविकार बरे होतात. पाचनशक्ती वाढते.
- जिरे वाटून मूळव्याधीच्या मोडावर त्याचा लेप दिल्याने मोडातून होणारा रक्तस्राव बंद होतो, त्या भागाची होणारी आग थांबते. मोड आत दाबला जातो.
हे सुध्दा वाचा:– सुंठ खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?
- जिरे खाल्ले असता पोटशूळ (पोटात दुखणे), मलावरोध, अपचन, मलास दुर्गंधी येणे हे विकार बरे होतात. जिरे खाल्ल्यास पोट फुगत नाही..
- जिऱ्याची पूड घेतली असता वांती होणे थांबते.
- सुंठ व जिरेपूड एकत्र करून मधातून घ्यावी. खोकला थांबतो.
- जिऱ्याची पूड साखरेतून खावी. आमांश, हगवण यांवर फायदा होतो. तसेच आम्लपित्त वाढून आंबट ढेकर येणे बंद होते.
- जिऱ्याच्या सेवनाने मातेच्या अंगावरील दुधाचे प्रमाण वाढते.
- जिऱ्याच्या सेवनाने लघवी भरपूर होते व त्यावाटे पोटातील बारीक सारीक कृमी निघून जातात.
- डोळे धुण्यासाठी जिऱ्याच्या पाण्याचा (Cumin benefits in marathi) वापर केला जातो.
Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.