व्हॉट्सॲप बंदी असणारे देश | Countries Where WhatsApp Is Banned

भारताबाहेर असणाऱ्या आपल्या नातेवाईक, मित्रमंडळीशी संपर्क साधायचा असेल तर फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. शिवाय कोणतेही आधीचे मूल्य यासाठी द्यावे लागत नाही. 2009च्या आधी ही परिस्थिती नव्हती. लोकांनां परदेशातील प्रियजनांशी संपर्क साधण्यासाठी काही ‘शे’ रुपये खर्च करावे लागत असे. त्याला ट्रम्प कॉल म्हटलं जायचं, ही सुविधा सर्वच लँड लाईन फोनमध्ये उपलब्ध नव्हती. त्यासाठी एमटीएनएलला संपर्क करावा लागायचा. ही प्रक्रिया फार जटील होती. 2009 आणि 2010 दरम्यान यात बदल घडला. कारण आता भारतात सुरुवात झाली होती एका टेलेकॉम क्रांतीची.

भारतात ‘व्हॉट्सॲप’ रुजू झालं होतं. सुरवातीला आयोएस फोनमध्ये आणि नंतर अँड्रॉईड फोनसाठी हे ॲप खुलं करण्यात आलं होतं. आज जगातील दोन अब्ज लोक याचा वापर करतात. संदेश पाठवायचा असेल ‘व्हॉट्सॲप कर’, एखादी फाईल पाठवायची आहे ‘व्हॉट्सॲप कर, थेट बोलायचं आहे ‘व्हॉट्सॲप कर’. आता तर पैसे पाठवायचे असतील तरीही ‘व्हॉट्सअॲप कर’ बोललं जात आहे. आपल्याला ह्या व्हॉट्सॲपची फार सवय झाली आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री आडवे होऊन अगदी डोळा लागेपर्यंत आपले डोळे त्यातच घुसलेले असतात. काही देशात मात्र व्हॉट्सॲप फार काळ टिकू शकले नाही. या देशात राहणाऱ्या आपल्या लोकांशी बोलायचं असेल तर व्हॉट्सॲप वापरता येत नाही. कारण काही देशांनी या व्हॉट्सॲप वर थेट बंदीच घातली आहे.

व्हॉट्सॲप बंदी असणारे देश | List of Countries Where WhatsApp Is Banned

चीन:

व्हॉट्सॲप वर बंदी घालणारा हा पहिला देश. 2017 मध्ये घातलेली ही बंदी आजतागायत कायम आहे. व्हॉट्सॲपच्या भक्कम कूटबद्धीकरण (एनक्रिप्शन ) यंत्रणेमुळे चीनच्या सत्ताधाऱ्यांना यावर नियंत्रण ठेवणे जड जाऊ लागले. सत्ताधाऱ्यांनी दिलेले कारण मात्र अधिकच रंजक म्हणावे असंच. ‘आम्हाला आमच्या स्वदेशी ॲपला प्रोत्साहन द्यायचे आहे त्यासाठी आम्ही ही बंदी आणत आहोत,’ असं चीन सरकारचं म्हणणं आहे. व्हॉट्सॲप बाद करून चीनने देशात ‘वीचॅट’ सुरू केले.

उत्तर कोरिया:

हा देश आजही जगात हुकूमशाही असल्याची आठवण करू देतो. देशाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांना व्हॉट्सॲपच्या कूटबद्धीकरण (एनक्रिप्शन)चा त्रास न होता तरच नवल. 2018 मध्ये कायदेशीररित्या व्हॉट्सॲपला देशातून नारळ देण्यात आला. या देशातील नागरिकांच्या जगातील लोकांना जोडणारे इंटरनेट देखील नशिबात नाही. केवळ तुरळक अधिकारी आणि परदेशी नागरिकांना इंटरनेट वापरण्याची मुभा आहे.

संयुक्त अरब एमिरात:

या देशातील सत्ताधारी व्हॉट्सॲप बंदीवर चीन प्रमाणे उत्तर देतात. या देशात हुकुमशाही नसली तरी राजेशाही आहे. हजारो पर्यटक या देशात पर्यटनासाठी जातात. पण कोणालाही व्हॉट्सॲपची सुविधा तिथे उपलब्ध नसते. ‘आम्हाला व्हॉट्सॲपच्या कूटबद्धीकरण (एनक्रिप्शन ) बद्दल कोणतीही तक्रार नाही. पण स्वादेशी ॲपना आम्ही प्रोत्साहन देऊ इच्छितो. त्यासाठी इथे व्हॉट्सॲप बंदी आहे’ असं तिथल्या सरकारचे म्हणणे आहे.

सीरिया:

सीरिया सरकारचा असा विश्वास आहे की शत्रू त्यांच्याविरुद्ध व्हॉट्सॲपच्या एंड-टू-एंड एन्क्रिप्शन धोरणाचा वापर करून कट रचू शकतात. ज्याचा देशाला आणि देशाच्या नागरिकांना त्रास होईल. त्यामुळे सीरिया देखील व्हॉट्सॲप बंदी करणाऱ्या देशांच्या यादीत आहे.

इराण:

इराणने व्हाट्सअप्पवर 2019 मध्ये बंदी घातली. आज देशात संदेश वहन करणारे एकही ॲप या देशात नाही. काही मंडळी आजही सरकारची नजर चुकवून हे ॲप वापरतात हेही खरंय. जर असे करताना कोणी पकडले गेले तर त्याला इराण सरकार कडून कोणती शिक्षा होईल याची कल्पना केलेली बरी.

व्हॉट्सॲप या देशांत बंद आहे. कारण देशात लोकशाही नाही. साम्राज्यशाही, एकाधिकारशाही किंवा हुकूमशाहीने वरील देश ग्रस्त आहेत. भले वरील देश व्हॉट्सॲपच्या बंदी मागे वेगवेगळी कारणे देत असले तरी याचे प्रमुख कारण आहे सत्ता गमावण्याची भीती. बंडाची ठिणगी उडवण्यासाठी व्हॉट्सव्हॉट्सॲप बंदी असणारे देशपसारखे माध्यम या व्यवस्थेला पुरेसे आहे. जवळ आलेल्या जगाशी संपर्कच येऊ न देणे हेच यामागचे कारण.

भारतीय व्यवस्थेने देखील असा प्रयत्न केला होता हे आपल्याला ठाऊक असेलच. विषय न्यायालयात देखील गेला. यामागचे भारतीय कारण हे देशातील लोकशाही संपवणे नसून लोकशाहीत जगणाऱ्या लोकांच्या गोपनीयतेचे रक्षण करणे हे होते. व्हॉट्सव्हॉट्सॲप बंदी असणारे देश राबवू इच्छिणाऱ्या नव्या आयटी नियमामुळे होते. आज हे व्हॉट्सव्हॉट्सॲप बंदी असणारे देश पण आपल्या हातात आहे. पण त्याचा गैरवापर करून समाजात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करणारे अनेक लोक आहे. त्यांच्यापासून सावध राहणं आणि आपण किती या मेसेजेस ना बळी पडायचं हे आपण ठरवलं पाहिजे.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button