धने खाण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? | Coriander seeds benefits in marathi

धन्याचे (Coriander seeds) रोप एक ते दीड फूट वाढते. यालाच कोथिंबीर म्हणतात. कोथिंबीर स्वादिष्ट, सुगंधित असून पाचक, रुचिकारक, पित्तशामक आहे. ओले धने सुकवून केलेली धन्याची डाळ ‘मुखवास’ म्हणून वापरली जाते. भाजलेली धन्याची डाळ सैंधव, लिंबाचा रस घालून अधिक रुचकर व स्वादिष्ट करता येते.

धने खाण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का? |Coriander seeds benefits in marathi

 • धने तुरट, हलके, तिखट, कडवट, मूत्रवर्धक, पाचक, रुचिकारक व त्रिदोषहारक आहेत.
 • धने व खडीसाखरेचे सेवन केले असता पोटातील आगीचे शमन होते.
 • धने रात्री भिजत घालून सकाळी ते पाणी गाळून घ्यावे. त्यात खडीसाखर घालावी. असे पाणी प्यायल्याने पित्तप्रकोपाचा त्रास कमी होतो.
 • सातूचे पीठ व धने वाटून त्याचे पोटीस बांधले असता सूज उतरते.
 • चमचाभर धने उकळवून त्यात दूध व साखर घालावे. असा चहा दररोज प्यायल्याने पचनक्रिया सुधारते व भूकही चांगली लागते.
 • तोंडाला चव नसेल तेव्हा धने, जिरे, बेदाणे, सैंधव, पुदिना यांची चटणी लिंबाच्या रसात एकत्र करून खावी. तोंडाला चव येते.
 • धने व बडीशेपेचा काढा प्यायल्याने शरीरातला आम निघून जाण्यास मदत होते व बेचैनी, मूत्रदाह वगैरे विकारही बरे होतात.
 • धने, जिरे पाण्यात रात्रभर भिजवावे व सकाळी चांगले कुसकरून त्या पाण्यात खडीसाखर घालून प्यायल्याने अंगातली उष्णता कमी होते. कोठ्यामध्ये होणारी आग तसेच अंगाची व हातापायाची आगही थांबते.
 • धने व बेदाणे चांगले कुटून पाण्यात कुसकरून घ्यावेत व हे पाणी गाळून घ्यावे. तापामध्ये वारंवार उलट्या होत असतील तेव्हा हे पाणी रुग्णाला चमचा-चमचा दिल्यास उलट्या होणे बंद होते.
 • धन्याचे पाणी डोळे धुण्यासाठी वापरल्याने डोळे दुखणे बंद होते.

हे सुध्दा वाचा: तमालपत्र खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

 • हिरवे धने वाटून गरम करावे व पुरचुंडीमध्ये भरून मूळव्याध झाली असता शेकावे म्हणजे मूळव्याधीचा मोड मऊ पडतो व मोड दुखण्याचे थांबते.
 • कोथिंबीर वाटून त्याचा रस काढावा व स्वच्छ कपड्यात गाळून घ्यावा. हा रस दोन थेंब दोन्ही डोळ्यात सकाळ, संध्याकाळी घातल्यास डोळे दुखण्याचे बंद होते. डोळ्यांच्या विकारात याचा खूप फायदा होतो.
 • कोथिंबिरीचा रस प्यायल्याने मूळव्याधीमध्ये शौचावाटे पडणारे रक्त बंद होते.
 • पित्तप्रकृती असणाऱ्या लोकांनी आपल्या आहारामध्ये धन्या-जिऱ्याचा वापर करणे अतिशय फायदेशीर असते.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button