दालचिनी खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Cinnamon benefits in marathi

दालचिनी नामक वृक्षाची साल म्हणजेच दालचिनी, मसाल्याच्या पदार्थांमध्ये जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी आवर्जून वापरली जाणारी दालचिनी अनेक रोगांवर उपयोगी आहे.

दालचिनी खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Cinnamon benefits in marathi

  • दालचिनी पाचक आहे. अन्नपचनाचे कार्य दालचिनी करते. कफ व खोकल्यावर अत्यंत गुणकारी अशा दालचिनीमुळे पोटात वायू धरणे, पोट फुगणे अशा विकारांवरही नियंत्रण ठेवले जाते.
  • दालचिनी, गवती चहा, सुंठ, लवंग, मिरी यांचा काढा गरमागरम घेतल्याने ताप आलेल्या रुग्णास दरदरून घाम सुटतो व ताप उतरतो.
  • दालचिनीचे बारीक चूर्ण करून त्याच्यामध्ये थोडे पाणी घालावे. ही तयार झालेली पेस्ट कपाळावर लावली असता सर्दीचा भर आटोक्यात येतो व डोकेदुखीपासूनही मुक्तता मिळते. दालचिनीचे बारीक चूर्ण मधामध्ये मिसळून दिवसा व रात्री हे चाटण दिले असता जुनाट सर्दीने बेजार झालेल्या रुग्णाला नक्कीच आराम मिळतो.

हे सुध्दा वाचा:लवंग खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

  • सांधेदुखी, सांधे आखडणे यांवरही दालचिनीच्या तेलाचा उपयोग होतो. उठताना, बसताना, हालचाल करताना सांधे दुखतात व त्यातून कळा येऊ लागतात. अशा वेळेला दुखरा भाग दालचिनीच्या तेलाने हळूहळू चोळावा व गरम कापडाने शेकावा. तसेच दालचिनीच्या चमचाभर तेलाचे सेवन करावे. बराच उतार पडतो.
  • दात किडणे, दात वरचेवर साफ न केल्यामुळे होणारी दुर्गंधी, दातांच्या तक्रारी यांवर दालचिनीच्या तेलाचा उपयोग होतो. दात शिवशिवणे, दातामधून कळा येणे अशा अनेक समस्यांवर हे तेल उपयोगी पडते. अशा वेळी तिळाच्या तेलाने गुळण्या करून दुखऱ्या भागावर दालचिनीच्या तेलात भिजवलेला कापसाचा बोळा ठेवला असता कळ येणे थांबते.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button