मिरची खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Chilli health benefits in marathi

मित्रांनो पदार्थाना तिखट चव प्राप्त करून देण्याचे काम मिरची (Chilli) करते. हिरव्या व सुक्या मिरच्या आपल्याला सहज उपलब्ध होतात. भाजी, आमटीमध्ये आपण मिरचीचा वापर करतो. त्याशिवाय चटणी, रायते, भजी, लोणचे यामध्ये मिरच्या वापरतात. मिरची दळून त्याचा मसालाही स्वयंपाकात वापरता येतो.

मिरची खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Chilli health benefits in marathi

  • मिरच्या तिखट, उष्ण, पाचक, पित्तकारक, रक्तवर्धक, कृमिनाशक, कफनाशक असतात. सुक्या मिरच्या वायुनाशक असतात.
  • कॉलरा झाला असता कापूर, हिंग व मिरच्या समप्रमाणात घेऊन कुटाव्यात व त्याच्या हरभऱ्या एवढ्या गोळ्या कराव्यात. दर तासाने दोन गोळ्या घेतल्यास अतिशय फायदा होतो.
  • मिरच्यांचे बी गरम पाण्यातून घेतल्याने सर्दीने उत्पन्न होणारा पोटाचा त्रास कमी होतो.
  • सुक्या मिरच्या वाफवून त्याचा काढा जेथे ढेकूण झाले असतील तेथे टाकल्याने ढेकणांचा त्रास कमी होतो.
  • विंचवाचा दंश झाला असेल तेथे लवंगी मिरची वाटून लेप लावावा.

हे सुध्दा वाचा: लसूण खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

  • कोथिंबीर, खोबरे, मीठ व मिरचीची चटणी करून खाल्ल्यास अरुची दूर होते.
  • पोटदुखी, हगवण, आमांशाचा त्रास झाल्यावर मिरचीपुड मध्ये दुप्पट गूळ घालून गोळी तयार करावी व कोमट पाण्याबरोबर खावी.
  • शरीराच्या कोणत्याही भागावर आलेली सूज घालवण्यासाठी राईच्या तेलात लाल मिरची गरम करून तेल गाळून ते सुजेवर लावावे.
  • कुत्रे चावले असता लाल मिरची (red chilli) वाटून जखमेत भरावी.

मिरची खाण्याचे नुकसान तुम्हाला माहित आहे का?

मिरच्यांचे अतिरेकी सेवन शरीराला अत्यंत हानिकारक असते उष्ण प्रकृतीच्या, पित्त प्रकृती असलेल्या लोकांनी, ज्यांना वायुप्रकोप झाला असेल, दाह- प्रमेह लघवीची जळजळ यांचा त्रास असेल त्यांनी मिरचीचे अतिरेकी सेवन टाळावे. मिरचीच्या जादा सेवनामुळे रक्तातील उष्णतेचे प्रमाण वाढणे, त्वचारोग, नेत्ररोग, जठर शिथिल होणे आदी त्रासही होतो.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button