हेल्थ इन्शुरन्स घेताना ‘या’ गोष्टी नक्की तपासा | Checklist before buying health insurance

कोरोना महामारीनंतर हेल्थ इन्शुरन्स बाबत लोक आता जागृत झाले आहेत. मात्र हेल्थ इन्शुरन्स ची निवड करताना तुमच्या वैयक्तिक खर्चाच्या गरजा पूर्ण होतात का हे तपासून घ्यावे. पण आरोग्य विमा पॉलिसीचे कागदपत्र समजणे कठीण आहे. कारण आरोग्य विमा पॉलिसीमधील अटी खूप गुंतवणुकीच्या असतात. त्यामुळे काही आजार हेल्थ इन्शुरन्समध्ये मध्ये कव्हर होत नसतील तर आधी वैयक्तिक बिले तुम्हाला अडचणीत आणतील व परिणामी तुम्हाला भरावी लागू शकतात. त्यामुळे आरोग्य विमा पॉलिसीमध्ये समाविष्ट नसलेल्या रोगांच्या विशिष्ट यादीसाठी विमा कंपनी तुमचा क्लेम नाकारू शकते.

हेल्थ इन्शुरन्स घेताना ‘या’ गोष्टी नक्की तपासा | Checklist before buying health insurance

दातांवरील उपचार

आपल्याला काही दातांची समस्या उद्भवल्यास दातांच्या उपचारांना सहसा हॉस्पिटललायझेशनची आवश्यकता नसते. म्हणून ते कव्हर होत नाही मात्र त्याउलट अपघाती प्रकरणात दुखापतीमुळे दातांचा खर्च झाला असल्यास तो खर्च विमा पॉलिसीमध्ये समाविष्ट केला जातो.

आधीच असलेले आजार

जर तुम्हाला आधीच काही आजार अस्तित्वात असेल तर त्या आजारांमुळे तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो. विमा क्षेत्रातील निगडित ज्ञानी तज्ञांची असे मत आहे की ज्या माणसांना विमा पॉलिसी अवगत करण्यापूर्वी एखाद्या आजाराने ग्रासले असले तर त्या माणसांना या आजाराचे संरक्षण मिळू शकत नाही. मात्र ही अट आणि संबंध वेटिंग पिरियड विमा कंपनीनुसार बदलतो.

गर्भधारणा किंवा वंध्यत्व

गर्भपात किंवा वंध्यत्व इत्यादीसारख्या इतर काही गर्भधारणेशी निगडित गुंतागुंत झाल्यास हॉस्पिटलयझेशनचा खर्च आरोग्य विमा पॉलिसीच्या कव्हरेज मधून काढून टाकण्यात आला आहे. पण काही विशेष योजना अर्थात प्रस्तुती आरोग्य योजना अशा खर्चाची पूर्तता अमलात आणू शकतात. परंतु त्या योजनेला वेटिंग पिरियड असू शकतो.

हे सुध्दा वाचा – पैशाची नितांत गरज असताना कोणते कर्ज निवडावे, पर्सनल लोन की गोल्ड लोन?

डोळे व कानासंबंधित समस्या

आपण डोळ्यांनी पाहतो व कानांनी ऐकतो तेव्हा या दोघांशी निगडित दोन प्रकारचे आजार असू शकतात. हे दोन प्रकारचे आजार आधीच अस्तित्वात असू शकते किंवा अपघातामुळे हॉस्पिटललायझेशनची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे पहिल्या प्रकरणात ते सुरक्षित नाही तर दुसऱ्या प्रकरणात जर उपचारांना हॉस्पिटललायझेशनची आवश्यकता नसेल तर कव्हरेज उपलब्ध नाही.

कॉमेस्टिक सर्जरी

कॉमेस्टिक सर्जरीचा समावेश विमा कंपन्यांच्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये होत नाही. उदाहरण द्यायचे असल्यास बोटॉक्स, तुमच्या चेहऱ्यावर, कपाळावर, डोळ्यांखालील काळया रेषा आणि सुरकुत्या यापासून बचाव करण्यासाठी एक प्रचलित लोकप्रिय कॉस्मेटिक उपाय आहे. पण हे आरोग्य विमा पॉलिसीमध्ये समाविष्ट नाही. तसेच तत्सम किंवा इम्प्लांट शस्त्रक्रिया सारख्या प्रक्रिया देखील क्लेम केल्या जात नाही.

Note 1 – मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat (GK_dnyan) वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button