मित्रांनो अत्यंत सुवासिक असा गुणधर्म असलेली वेलची (Cardamom) मुखशुद्धीसाठी, पदार्थांना सुगंधित करण्यासाठी वापरली जाते. मुरांबा, सरबत, मिठाई, मसाले तसेच औषधांमध्ये वेलचीचा वापर होतो.
वेलची खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Cardamom benefits for health in marathi
- वेलचीचे दाणे, तूप, मध व सैंधव एकत्र करून चाटण चाटल्यास कफविकार बरा होतो..
- वेलचीच्या दाण्यांचे चूर्ण करून खाल्ले असता किंवा मधातून खाल्ले असता घाबरल्यासारखे होणे, अस्वस्थ वाटणे, उलटी होणे यामध्ये फायदा होतो.
- लघवीची जळजळ, हातापायांची आग होणे, शरीराची आग होणे यावर वेलचीचे चूर्ण आवळ्याच्या रसामधून घ्यावे.
- डाळिंबाच्या रसातून वेलचीचे चूर्ण खाल्ले असता उमासे येणे, उबके येणे, उलट्या होणे थांबते.
- भाजलेला हिंग व वेलची (Cardamom) चे चूर्ण लिंबाच्या रसातून थोड्या प्रमाणात कालवून त्याचे सेवन केल्याने पोटातील वायूमुळे पोट फुगणे, दुखणे यांवर फायदा होतो.
हे सुध्दा वाचा:– पिंपळमूळ खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?
- वेलचीचे चूर्ण व सुंठीचे चूर्ण समप्रमाणात डाळिंबाच्या रसातून घेतल्याने लघवी साफ होते.
- खजूर, द्राक्षे व वेलचीचे चूर्ण मधात खलून चाटवल्याने दम लागणे, खोकला व अशक्तपणा दूर होतो.
Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.