मसाल्यामधील मिरे ( pepper) हे अत्यंत आवश्यक घटक म्हणून उपयोगी ठरते. मिऱ्यांचा स्वाद तिखट असतो. मिऱ्यांचे दोन प्रकार आहेत काळे (Black) व पांढरे (white) . अर्धवट पिकलेले मिरे सुकवले की काळ्या रंगाचे होतात. हे बाजारात विकले जातात. यांच्या वापरामुळे पदार्थाला तिखटपणा येतो. मिरे पिकल्यावर त्याची टरफले गळून पडतात व पांढऱ्या रंगाचे दिसतात त्यांना पांढरे मिरे म्हणतात. मिरे पूर्ण पिकल्यावर त्यांचा स्वाद खुलून येतो व तिखटपणाही थोडा कमी होतो.
काळे व पांढरे मिरे खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Black and white pepper health benefits in marathi
- मिरे गरम, पित्तकारक, रुक्ष, अग्निप्रदीपक, तीक्ष्ण, तिखट व कफहारक आहेत.
- मिऱ्याचे चूर्ण, मध, तूप व साखर यांचे मिश्रण चाटल्यास खोकला बरा होतो. सफेद मिरे, तूप व साखर एकत्र करून खाल्ल्याने मेंदूच्या उष्णतेची तीव्रता कमी होते तसेच डोळ्यांचे तेजही वाढते.
- नेत्रांजनामध्ये सफेद मिऱ्यांची वस्त्रगाळ पूड घालून त्याचे थेंब डोळ्यात टाकल्याने डोळ्यातील घाण बाहेर येते. डोळे थंड होऊन. दृष्टी सतेज होते.
- खारीक, मिरे, बेदाणे, पुदिना, हिंग व सैंधव एकत्र करून वाटावे व त्याची चटणी करून त्यात लिंबू पिळावे. ही चटणी खाल्ल्याने अरुची दूर होते. अपचन, गॅसेस व पोटात गुबारा धरणे आदींवर त्याचा फायदा होतो.
- स्वच्छ, ताज्या ताकामध्ये मिरपूड घालून प्यायल्याने मुरडा बरा होतो.
- उलट्या होत असल्यास मिरे व मीठ एकत्र करून खावेत.
हे सुध्दा वाचा:– मोहरी खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?
- जास्त झोप येत असल्यास ती घालविण्यासाठी मिऱ्याचे दोन-चार दाणे खावेत.
- सकाळ संध्याकाळ मिऱ्याचे दोन-तीन दाणे खाल्ले असता पोटातील जंताचे प्रमाण कमी होते.
- मक्याच्या रसात मिरे वाटून त्याचा लेप लावल्यास अर्धशिशीवर फायदा होतो.
- मिऱ्यांच्या अतिरेकी सेवनाने जठरदाह, पोटात कळा येणे, उलट्या होणे यांसारखे त्रास उद्भवतात. मिरे उष्ण व रुक्ष असल्यामुळे ज्यांना आतड्यांचा त्रास असेल त्यांनी मिऱ्यांचा वापर जपून करावा.
Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.