स्त्री सुरक्षेसाठी हे ॲप्स आहेत खूप उपयोगी | Best Women Safety Apps

देशातील स्त्री सुरक्षित आहे, असं म्हणता येईल अशी आजची परिस्थिती नाही. 2019 या एका वर्षात नोंदवल्या गेलेल्या बलात्कारांची संख्या 32,032 एवढी आहे. त्याच्या मागील वर्षी हा आकडा 33 हजारच्या वर गेलाय. घरगुती हिंसेच्या नोंदणीकृत घटनांत 2019 मध्ये 2018च्या तुलनेत 38 टक्के एवढी वाढ झाली आहे. या सर्व आकडेवारीची तुलना मागील काही दशकांशी केली तर परिस्थितीची भयावहता आपल्या लक्षात येईल. अनेकदा स्त्रिया संकटात असतात मात्र त्यांना मदत मिळत नाही. काहीवेळा नेटवर्क, इंटरनेट याच्या अभावी मदत मागवता येत नाही. यासाठी आजच्या लेखात अशा ॲप्लिकेशन्स बद्दल जाणून घेणार आहोत जे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मदत करू शकतील. स्त्रिया संकटात असल्यास या ॲपच्या साहाय्याने संदेश, स्थळ वैगरेची माहिती पोलीस वा कुटूंबियांना पाठवून मदत मिळवू शकतात.

स्त्री सुरक्षेसाठी हे ॲप्स आहेत खूप उपयोगी | Best Women Safety Apps information in marathi

1) सेफ्टीपिन (Safetipin):

महिलांसाठी सुरक्षा ॲपचा विचार करता सेफ्टीपिन हा एक चांगला पर्याय आहे. वैयक्तिक सुरक्षिततेची संकल्पना लक्षात घेऊन हे तयार केले आहे. यात जीपीएस ट्रॅकिंग, आपत्कालीन संपर्क क्रमांक, सुरक्षित ठिकाणांचे दिशानिर्देश इत्यादी सर्व आवश्यक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. यात कोणत्याही समस्येच्या वेळी सुरक्षितता गुणांसह जवळचे सुरक्षित क्षेत्र देखील पिन करण्यात येते. हे वापरकर्त्यांना असुरक्षित क्षेत्रे पिन करण्यास आणि इतरांना मदत करण्यास सहाय्य करते. सेफ्टीपिन इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, इंडोनेशियाची भाषा बहासा आणि स्पॅनिशमध्ये उपलब्ध आहे.

2) रक्षा महिला सुरक्षा इशारा (Raksha women safety alert)

महिला नेहमी सुरक्षित राहतील याची खात्री करण्यासाठी रक्षा ॲप तयार केले आहे. हे अँप एका बटणासह सुसज्ज आहे, जे आपल्या प्रियजनांना संकटाच्या स्थितीत आपल्या स्थानासह अलर्ट पाठवेल. यात आपण संपर्क निवडू शकता ज्यांना आपल्याला संबंधित अलर्ट पाठवायचा आहे. शिवाय, जर अँप काम करायचे थांबले आणि अडकले असेल तरीही तुम्ही फक्त तीन सेकंदांसाठी व्हॉल्यूम की दाबून ठेऊन अलर्ट पाठवू शकता. इंटरनेट नसलेल्या क्षेत्रात अडकल्यास देखील हे अँप मदत करते.

3) हिम्मत (Himmat)

महिलांसाठी असलेल्या हिम्मत ह्या ॲपची संकल्पना दिल्ली पोलिसांची आहे. विनामूल्य सुरक्षा पुरवणारे हे ॲप आहे. ॲप वापरण्यासाठी, वापरकर्त्यास दिल्ली पोलीसांच्या वेबसाइटवर नोंदणी करावी लागते. एकदा का नोंदणी पूर्ण झाली की वापरकर्त्यास ओटीपी प्राप्त डेटा मिळतो जो ॲप उघडल्यावर तिथे टाकायचा असतो. संकट समयी वापरकर्त्याने ॲपमधून एसओएस अलर्ट पाठविल्यास स्थान माहिती आणि ऑडिओ व्हिडिओ थेट दिल्ली पोलीस नियंत्रण कक्षापर्यंत प्रसारित केला जातो, त्यानंतर पोलीस तात्काळ तिथे मदत पोहचवू शकतात.

4) स्मार्ट 24×7 (Smart24x7 )

हे ॲप विविध राज्यांच्या पोलिसांद्वारे फक्त महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी समर्थित आहे. ॲप समस्याग्रस्त परिस्थितीत आपत्कालीन परिस्थितीत संकटात असल्याचा संदेश पाठवते. यातून आवाज देखील रेकॉर्ड होतो आणि छायाचित्र देखील घेता येतं. ही सर्व माहिती पुढे पोलिसांकडे देखील हस्तांतरित केली जाते. यात कॉल सेंटर सपोर्ट देखील आहे, जो वापरकर्त्याच्या प्राथमिक हालचालींचा मागोवा घेईल. वापरकर्त्यांनी फक्त संकटकालीन बटण दाबून आवश्यक सेवा प्रकार निवडायला हवा आणि नंतर शेवटी खात्री करणे आवश्यक असते.

इथे एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे हे ॲप स्त्री सुरक्षेत भर टाकतील याविषयी शंका नाही. मात्र स्त्रियांच्या असुरक्षित वातावरणाचा समाचार घेण्यात हे ॲप यशस्वी होतीलच असं नाही. आजवर अनेक कठोर कायदे करण्यात आले तरी ही असुरक्षितता कमी झाली नाही. किंबहुना वाढली. हे ॲप त्याला लगाम लावतील. पण समूळ उच्चाटन करू शकणार नाहीत. यासाठी आवश्यक आहे ‘मानसिक बदल’. त्यासाठी देखील एखादे अँप निघणार का?

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button