मित्रांनो या पहिल्या आपण जाणून घेतले की, म्युच्युअल फंड म्हणजे काय? आज आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत म्युच्युअल फंडाचे कोणकोणते फायदे आहेत.
म्युच्युअल फंडाचे फायदे | Benefits of mutual funds in marathi
व्यावसायिक व्यवस्थापन (Professional Management)
गुंतवणूकशास्त्राचे ज्ञान व कौशल्य असणारे व्यावसायिक तज्ज्ञ म्युच्युअल फंडाकडे असतात. कारण लाभदायी गुंतवणूक करायला विशेष ज्ञान आणि अनुभवाची आवश्यकता असते. आपल्यापैकी काहींना असे ज्ञान जरी असले तरी, असा अभ्यास करायला लागणारा वेळ व साधने नसतात. काही मासिके वाचली, कोर्स केले, किंवा फायनान्शियल टीव्ही चॅनल्स बघितले की ते ज्ञान आपल्याला आले असे होत नाही. गुंतवणूक करण्यासाठी अनेक गोष्टींचा सखोल अभ्यास असणे गरजेचे असते. देशाच्या आर्थिक स्थितीवर आणि पर्यायाने इथल्या भांडवलबाजारावर परिणाम करू शकणाऱ्या अनेक गोष्टींचा वेध घेण्याची जरुरी असते.
त्यात मॅक्रोइकॉनॉमिक (एकूण आर्थिक स्थिती) आणि मायक्रोइकॉनॉमिक (कंपनीवर परिणाम करणारी विशिष्ट कारणे) अशा अनेक घटकांचा समावेश होतो. याबरोबरीने कंपन्यांचे मूलभूत (फंडामेंटल अॅनालिसिस) विश्लेषण करणे जरुरीचे असते, ज्यात कंपनीचा ताळेबंद आणि अन्य माहिती अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करणे अपेक्षित असते. म्युच्युअल फंडाचे विश्लेषक कंपन्यांना भेटी देऊनही अधिक माहिती मिळवतात, जे सामान्य गुंतवणूकदाराला जमत नाही. याशिवाय उपलब्ध माहितीचा अर्थ लावून योग्य निर्णय घ्यायला म्युच्युअल फंड विश्लेषकांचा आणि फंड मॅनेजर्सचा दीर्घ अनुभव कामाला येतो. म्युच्युअल फंडांची शेअर निवडण्याची प्रक्रिया सांधिक असते. अनेक चाळण्या लावून शेअर्स निवडले जातात. चांगला फंड मॅनेजर आणि अशी नीरक्षीरविवेक करणारी प्रक्रिया असेल तर त्या योजनेची कामगिरी चांगली होऊ शकते.
गुंतवणुकीतील वैविध्य (Diversfication)
शेअर्समधील जोखीम म्हणजे म्हणजे भविष्यातला भाव कसा राहणार हे अनिश्चित असते, जे मुख्यत: कंपनीच्या कामगिरीवर अवलंबून असते. त्यामुळे जोखीम कमी करण्याचा एक चांगला उपाय म्हणजे थोड्याच कंपन्यांवर अवलंबून न राहता, वेगवेगळ्या क्षेत्रांमधील अनेक कंपन्यांचे शेअर्स घेणे. वैयक्तिक पातळीवर आपण मर्यादित प्रमाणातच शेअर्स खरेदी शकतो. परंतु म्युच्युअल फंडाकडे अनेकांची रक्कम एकत्रित होत असल्याने एका योजनेत 3 ते 60 कंपन्यांचे शेअर्स घेतले जातात.
गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या 20 पेक्षा जास्त क्षेत्रांमध्ये व्यापक प्रमाणात गुंतवणूक असल्याने जोखीम कमी होते. शेअरबाजारातील मोठ्या, मध्यम, आकाराच्या (मार्केट कॅपच्या) आणि विविध क्षेत्रांमधल्या (उदा. माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, भांडवली माल, उर्जा, तेल व वायू इत्यादी) वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स घेणे. म्युच्युअल फंड योजनांनाच शक्य असते. ‘कॉन्संट्रेशन रिस्क’ म्हणजे थोड्याच कंपन्यात गुंतवणूक न झाल्यामुळे जोखीम कमी होते.
तरलता (Liquidity)
चांगल्या गुंतवणुकीचे एक वैशिष्ट्य म्हणजे तरलता. केलेली गुंतवणूक पाहिजे तेव्हा काढता येणे जे म्युच्युअल फंडाच्या खुल्या योजनांमध्ये शक्य असते. डेट योजनेतून एक दिवसाने, तर इक्विटी योजनेतून काढलेली रक्कम तीन दिवसांनी मिळू शकते.
हे वाचा- म्युच्युअल फंड म्हणजे काय ?
सोय आणि लवचीकता (Convenience)
- जोखमीच्या सुयोग्य व्यवस्थापनाबरोबरीने व्यवहाराचे सुलभ नियम यामुळे म्युच्युअल फंडाच्या योजनेत पैसे गुंतवणे सोयीचे होते.
- आर्थिक नियोजनानुसार योग्य ती योजना निवडण्यासाठी 40 पेक्षा अधिक म्युच्युअल फंड कंपन्यांच्या डेट, इक्विटी आणि बॅलन्स्ड योजनांच्या विश्वातून आपल्याला पाहिजे त्या योजनेची निवड करता येते.
- संगणकावरून (इंटरनेटद्वारा) किंवा फोनवरही (एसएमएसने) युनिट्सच्या खरेदी/ विक्रीचे व्यवहार करता येतात.
- डीमॅट खाते आवश्यक नाही.
- अगदी थोड्या रकमेत म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे सर्व फायदे. किमान रक्कम 500 रुपयांपासून भरता येते.
- युनिट्सची खरेदी आणि विक्री म्युच्युअल फंडाकडूनच होत असल्याने खरेदीदार शोधायची गरज नसते.
प्राप्तिकर सवलती
याव्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाचा फायदा म्हणजे, मुदत ठेव, रिझर्व्ह बँक रोखे, एनएससी यासाख्या गुंतवणूक प्रकारांपेक्षा म्युच्युअल फंडाच्या योजनांना अधिक प्राप्तिकर सवलती आहेत, ज्यामुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक अधिक फायदेशीर होते.
मित्रांनो आशा करतो की, तुम्हाला म्युच्युअल फंडाचे फायदे समजले असेल.या पुढच्या पोस्टमध्ये आपण म्युच्युअल फंडाचे कोणकोणते प्रकार आहेत ते जाणून घेणार आहोत.
Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.