मोहरी खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Benefits Of Mustard Seeds In Marathi

भाजी, आमटीमध्ये फोडणीच्या माध्यमातून मोहरीचा वापरली जाते. पांढऱ्या, काळ्या व लाल रंगामध्ये मोहरी मिळते. रायता व लोणच्यामध्येही राई घातली जाते.

मोहरी खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Benefits Of Mustard Seeds In Marathi

  • मोहरी मधात वाटून खाल्ल्याने सर्दी बरी होते.
  • सर्दी झाली असता मोहरीच्या तेलाने नाकाला मालीश करावे.
  • मोहरी पाण्यात भिजवून वाटावी. तो लेप पोटावर दिल्याने उलट्या होण्याचे प्रमाण लागलीच थांबते.
  • मोहरीचे चूर्ण साखरेमध्ये मिसळून खाल्ल्याने व त्यावर थोडे पाणी प्यायल्याने अपचनामध्ये बरे वाटते.
  • मोहरीचे तेल पायाच्या तळव्यांना चोळल्यास डोळ्यांमध्ये तेजस्वीपणा येतो. * मोहरीच्या तेलामध्ये हळदीची पूड मिसळून त्या मिश्रणाने दात घासल्याने पायोरिया दूर होतो. मीठ व मोहरीचे तेल एकत्र करून दात घासल्यास दात मजबूत व चमकदार होतात.
  • मोहरीची पूड तुपामध्ये घालून नायट्यावर लावली असता फायदेशीर ठरते. तसेच जखमांमध्ये कीड पडली असेल तर मोहरीचे चूर्ण तूप व मध यांमध्ये कालवून व्रणावर लावल्याने कीड मरते.
  • शरीरावर जखम झाली, त्वचा फाटून रक्त वाहू लागले तर मोहरीचे तेल लावल्याने रक्तस्राव थांबतो.
  • मोहरीच्या तेलात कापूर मिसळून केसांना लावल्यास केस काळे होण्यास मदत होते.

हे सुध्दा वाचा:धने खाण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का?

  • कान दुखत असेल, ठणका मारत असेल तर मोहरीच्या तेलात लसूण तळून, त्या तेलाचे काही थेंब कानात टाकावेत..
  • मोहरीच्या तेलात कापूर मिसळून छातीला चोळला असता छातीमध्ये साचलेला कफ मोकळा होऊन पडतो व आराम वाटतो.
  • रात्री झोपताना अंगाला मोहरीचे तेल लावल्यास अंग फुटत नाही…
  • पाण्यात मोहरी वाटून त्याचा लेप लावल्यास आखडलेले खांदे मोकळे होतात.
  • थंडीने हात, पाय व अंग थंड पडू लागल्याने मोहरीच्या तेलाने मालीश करावे.
  • मोहरीचे सेवन जास्त प्रमाणात केल्यास उलटी होते.
  • मोहरी उष्ण असल्याने तिचा वापर बेतानेच करावा. मोहरीच्या अतिरिक्त वापराने जठर व आतड्यांना हानी पोहोचू शकते.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button