संत्री खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Benefits of eating oranges in marathi

संत्री अत्यंत आवडीने खाल्ली जातात. मधुर अशा संत्र्याचा रस रक्तशुद्धीकारक, पाचक, भूक वाढविणारा असून मनालाही अवीट गोडीचा आनंद प्राप्त करून देतो. तहान, अरुची दूर करणारी संत्री पेय म्हणून अत्यंत गुणकारी ठरतात.

संत्री खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Benefits of eating oranges in marathi

  • आंबटगोड संत्री सारक, पचण्यास जड व वायुनाशक असतात. तसेच वातपित, पित्तविकार, वायुविकार यांवर गुणकारी असणारी ही संत्री तृषाशामक व उलटी बंद करणारी असतात.
  • पाचकगुणयुक्त संत्री पोटदुखी, कृमी, वात यांचा नाश करणारी तसेच खोकला, पित्त, अरुची, उलटी, वायू, शोष, तहान व दाह यांवर गुणकारी ठरतात.
  • संत्री पाचक असतात. रात्री जेवल्यावर झोपण्याआधी एक गोड संत्रे खाल्ल्याने मलावरोध होतो. संत्र्याचा आहारात नियमितपणे वापर केल्याने पोटातील कृमी नाहीसे होतात.
  • संत्र्याची साल चेहऱ्यावर घासावी. त्यातून येणाऱ्या पाण्यामुळे मुरूम व पुटकुळ्यांवर नियंत्रण राखता येते.
  • गरोदर स्त्रियांना उलटी, मळमळ यासारख्या लक्षणांवर गोड व परिपक्व संत्रे खाऊ घालावे.
  • शरीरास पुष्टी व बल देणाऱ्या संत्र्यांमुळे आतडी मजबूत होतात. पोटामधील वायूही दूर होतो. शरीरात उष्णतेमुळे होणाऱ्या रोगांवर फायदा होतो. संत्र्याच्या सेवनामुळे चक्कर येणे बंद होते.

हे सुध्दा वाचा – फणस खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे?

  • रात्री झोपण्यापूर्वी तसेच सकाळी उठल्यावर संत्र्याचा रस घेतल्याने पचनशक्ती सुधारते तसेच जीर्ण मलावरोधाचा त्रासही होत नाही.
  • पित्तविकारामध्ये संत्र्याच्या (गोड) रसाचा फायदा होतो.
  • संत्र्याच्या मधुर रसापासून बर्फी बनविता येते. (नागपुरची बर्फी प्रसिद्ध आहे)
  • दुर्बल, कमजोर जठर कार्यक्षम व सतेज करण्यासाठी संत्र्याचा उपयोग होतो.
  • उन्हाळ्यात तहान लागणे, शोष पडणे यांवर गोड संत्र्याचे सरबत गुणकारी ठरते. आजारातून उठलेल्या माणसाला तसेच उपवास करणाऱ्यांना संत्री खाणे हितावह असते.
  • संत्र्यामध्ये लोह, कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असल्याने रक्ताची वाढ होते, शरीराचे वजन वाढते. दात, हिरड्या व हाडे मजबूत होतात.

Note 1– आंबट संत्री खाल्ल्यामुळे सर्दी, खोकला व पित्त होण्याचा संभव असतो.

Note 2 – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button