लवंग खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Benefits of Clove in Marathi

मसाल्याच्या पदार्थांमध्ये लवंगेचे (Benefits of Clove) स्थान उच्च दर्जाचे आहे. चमचमीत आणि झणझणीत पदार्थाची लज्जत लवंगेमुळेच वाढवली जाते. अशा चटकदार पदार्थांमधून जिभेचा चुरचुरीतपणा वाढवणारी लवंग, गंमत म्हणजे साखरभातासारख्या गोड पक्वान्नामध्येही तितकीच खुलून येते. लवंग जंतुनाशक आहे, कफनाशक आहे. तसेच शक्तिकारकही आहे. रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होण्यासाठी, हृदयाला बलकारक ठरण्यासाठी लवंगेचा उपयोग होऊ शकतो.

लवंग खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Benefits of Clove in Marathi

  • दम्यावर लवंग (Lavang ) उपचाराचा फायदा होतो. दम्याचा जोर वाढला असता कधीकधी धाप लागल्यासारखे वाटते. श्वासोश्वास नीटपणे घेता येत नाही. बोलताना धाप लागते. एकंदरीत काय? तर आपले शरीर पार हतबल होते. अशा वेळेला दोन लवंगा दाताखाली चावून धरल्या असता हळूहळू कफ सुटायला लागतो व घसाही मोकळा होतो.
  • दातदुखी, दाढदुखी झाली तर पार हतबल व्हायला होतं. काही खाववत नाही, गिळवत नाही. एकूणच शरीरावर दाताच्या ठणक्यांचा फार परिणाम होतो. अशा वेळेस लवंगांचे तेल उपयोगी पडते. कापसाचा बोळा लवंगतेलामध्ये बुडवून दुखऱ्या दाताखाली ठेवला असता खूपच फरक पडलेला दिसून येतो.
  • रातांधळेपणा, संग्रहणी यावरही लवंगांचा उपयोग होतो. सर्दीमुळे सतत शिंका येणे, नाक चोंदणे, डोकेदुखी यासारखा त्रास होऊ लागतो. अशा वेळेला सुंठ व लवंग एकत्र वाटून थोडे गरम करावे. त्याचा लेप नाकावर व कपाळावर लावला असता सर्दीचे उच्चाटन व्हायला मदत होते.

हे सुध्दा वाचा:ओवा खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

  • लवंगांच्या काढ्याचे सेवन रोज थोड्या थोड्या प्रमाणामध्ये केले असता भूक सुधारते, मनःस्वास्थ्य चांगले राहते. पोटाला रग लागणे, पोट फुगणे अशा विकारांवरसुद्धा ते उपयोगी पडते.
  • पोटात दुखून आव पडणे, मुरडा होणे अशा विकारात लवंगेचे बारीक चूर्ण करून मधातून चाटवावे. आवेचे प्रमाण कमी होते.
  • मूत्रपिंडातील व मुत्रमार्गातील दोषहारक म्हणून लवंगांच्या काळ्याचा उपयोग केला जातो. रक्ताभिसरण, रक्ताला बल प्रदान करण्यासाठी लवंगांचा उपयोग होतो. लवंग दाताखाली धरल्याने मळमळल्यासारखे होणेही थांबते.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button