ओवा खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? |Benefits Of ova In Marathi

मित्रांनो आजीबाईंच्या बटव्यामधील ओवा (ova) हे प्रमुख औषध आहे. ओव्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. घरामध्ये ओव्याला निर्विवाद महत्त्व आहे ते त्याच्या औषधी गुणधर्मामुळे. ओव्याच्या पानांची भजी करतात. खाण्याच्या पानामध्ये ही ओव्याच्या पानांचा वापर केला जातो. ओव्याची आपल्या घरातील कुंडीमध्ये लागवडही केली जाते. पाचक, रुचीकारक, जठराग्नी प्रदीपक अशा ओव्याला घरात अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरगुती औषध म्हणून समाजातील सर्व थराच्या लोकांकडे ओव्याचा वापर केला जातो.

ओवा खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Benefits Of Ajwain In Marathi

  • पोटदुखीवर ओव्याचा (Ajwain) फार चांगला उपयोग होतो. ओवा चावून खाल्ल्यास व त्यावर गरम पाणी प्यायल्यास पोटदुखी बरी होते. ओवा, हिंग व मीठ एकत्र करून खाल्ल्यासही लवकरच आराम पडतो.
  • सांधेदुखी, सांधे आखडणे, हातापायाची हालचाल व्यवस्थितरीत्या न होणे यावर उपाय म्हणजे ओव्याच्या तेलाने दुखऱ्या भागावर मालीश करणे. ओवा वाटून त्याचे पोटीस दुखऱ्या भागावर बांधले असताही पुष्कळ आराम मिळतो. * रात्री अचानक दमा चाळवला जातो. हातपाय थंड पडतात. अशा वेळेस ओव्याची पुरचुंडी करून तव्यावर गरम करावी व त्याने शरीराला शेक दिल्यास थंड पडलेले अंग गरम होऊ लागते अथवा ओवा वाटून शरीरावर चोळल्यासही अंग गरम होते.
  • ओवा जंतुनाशक असल्याने तो पाण्यात उकळवून त्या पाण्याने जखमा धुवाव्यात. चिघळलेल्या, सडलेल्या जखमा ओव्याच्या पाण्याने धुतल्यास जंतुसंसर्गाची बाधा राहात नाही. बाळंतपणानंतर स्त्रीच्या योनीमार्गात ओव्याची पुरचुंडी ठेवण्याने जंतू प्रवेशावर आळा बसविला जातो. त्यातील जंतुनाशक गुणधर्मामुळे इन्फेक्शनही होत नाही.
  • अजीर्ण, अपचन या विकारामुळे पोटदुखीचाही त्रास सुरू होतो अशा वेळेला चिमूटभर ओवा चावून त्यावर कोमट पाणी प्यावे. अजीर्णाचा त्रास कमी होतो व पोटदुखीही थांबते.

हे सुध्दा वाचा:हिंग खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

  • कॉलऱ्याच्या साथीमध्ये ओव्याच्या पानांचा रस रुग्णाला दर तासाला पाजावा. जुलाब थांबेपर्यंत थोडा थोडा देत राहावा.
  • ओवा जंतुनाशक असल्यामुळे पूर्वी बाळंतिणीला ओव्याची धुरी देत असत. आरोग्यशास्त्राचा आधार असलेली ही पद्धत आज मात्र प्रचलित नाही.
  • ओवा खायला दिल्याने बाळंतिणीच्या अंगावर दूध भरपूर येते. पचनक्रिया सुधारते. याचा बाळाच्या प्रकृतीवरही चांगला परिणाम होतो.
  • ओव्याच्या बियांमधून येणाऱ्या तेलापासून ओव्याचे फूल बनवले जाते. याचा उपयोग कफ-खोकला आदी विकारांवर होतो.
  • ओवा तापावर सुद्धा गुणकारी आहे. सर्दी-खोकल्यावरही ओव्याचा उपयोग होतो. ओव्याची चमचाभर (छोटा) पूड गरम पाण्याबरोबर घेतल्याने सर्दी- खोकल्यावरही उतार पडतो.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button