हिंग खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Benefits Asafoetida in marathi

मित्रांनो जेवणामध्ये हिंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. फोडणी देण्यासाठी हिंगाची आवश्यकता भासते. जेवणाची रुची वाढवणे हे हिंगाचे मुख्य काम आहे. दक्षिण भारतामध्ये ‘सांबार’ ह्या लोकप्रिय प्रकारामध्ये हिंगाचा वापर करून त्याची लज्जत वाढवली जाते. परंतु हिंगाचा वापर फक्त जेवणामध्ये रुची निर्माण करणे इतकाच होत नसून औषधनिर्मिती करीताही होतो. हिंगाचा वापर केवळ पदार्थाला चव प्राप्त करून देणे, तसेच फोडणीसाठी उपयोगी पडणे एवढ्याच करिता नसून औषधरुपाने शरीरामध्ये होणाऱ्या बिघाडांपासून संरक्षणही देण्याकरीता आहे.

हिंग खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Benefits Asafoetida in marathi

  • हिंग गॅसनाशक आहे, वेदनाशामक आहे, पाचक आहे आणि कृमिनाशकही आहे. हिंगाचा औषधासाठीचा उपयोग चरकसंहिता, निघण्टू, रत्नाकर आदी आयुर्वेदामधील ग्रंथामध्येही लिहिला गेला आहे.
  • शरीरामध्ये वायूचे प्राबल्य जास्त झाले की तो इतरत्र आपले हातपाय पसरायला सुरुवात करतो. कधी कधी त्यायोगे छातीमधून कळाही येऊ लागतात. अशा वेळेस सैंधव, दालचिनी, ओवा आणि हिंग यांचे समप्रमाणात वस्त्रगाळ चूर्ण घ्यावे आणि सकाळी व रात्री मधामधून हे चाटण घेतल्याने 10-20 दिवसात बरे वाटू लागते.
  • प्रामुख्याने हिंगाचा अंतर्भाव असलेले ‘हिंगाष्टक चूर्ण’ अजीर्णावर मात करण्यासाठी वापरले जाते. हे चूर्ण पाव चमचा तुपामधून द्यावे. अजीर्णावर गुणकारी ठरते.
  • पोटात वायू धरल्यास त्याचा आतड्यांवर दाब पडतो, बेचैन व्हायला होते. माणूस पोटदुखीने हैराण होतो. अशा वेळेस सुंठ आणि काळीमिरी यांचे हिंगाबरोबर समप्रमाणात चूर्ण करून घ्यावे. दिवसातून आवश्यकतेनुसार दोन-तीनदा पाव चमचा चूर्ण घ्यावे. हा प्रयोग बरे वाटेपर्यंतच करावा.
  • हिंग कृमीघ्न आहे. पोटातील रोगजंतूंचा ते प्रभावीपणे नाश करते. चिघळलेल्या जखमांवरही हिंगाचा उपयोग होऊ शकतो. जखमेला कीड लागून दुर्गंधी येऊ लागली तर जखम सर्वप्रथम स्वच्छ करावी आणि त्यात हिंगपूड भरावी. किडे मरतात जखमही लवकर बरी होते.

हे सुध्दा वाचा:अंजीर खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

  • मासिक पाळीच्या काळात शरीराच्या अकारण ओढाताणीमुळे, स्त्रियांना कंबरदुखीचा त्रास होतो. त्यावर उपयोगी पडणाऱ्या ‘रजः प्रवर्तक’ चूर्णामध्येही हिंगाचा वापर केल्याचे आढळते.
  • डोळ्यांच्या त्रासामुळे डोकेदुखी उद्भवते. अशा वेळी हिंगाचा उपयोग केलेल्या ‘हिंग्वाभाघृत’ मुळेही डोळ्यांच्या विकारांवर आराम पडतो.
  • हिंग कापसामध्ये गुंडाळून कानात ठेवल्यास दडे बसण्यामुळे होणारा त्रास आटोक्यात येतो. भाजलेला हिंग कापसात गुंडाळून दुखऱ्या दाताखाली ठेवल्यास दात किडल्याने, दात दुखू लागल्याने होणारा त्रास बरा होतो. हिंग पाण्यात घालावा व ते पाणी थेंब, दोन थेंब नाकात सोडले असता अर्धशिशीवर आराम मिळतो. हिंग तिळाच्या तेलात घालून गरम करावा व कोमट झाल्यावर कानात चार-पाच थेंब घातल्यास कान दुखणे थांबते.
  • मुलांना पोटामध्ये कळ येऊन दुखत असेल तर बेंबीजवळ हिंगाचा लेप दिला असता वायू बाहेर पडून जातो व आराम वाटतो.
  • हिंगाच्या छोट्या छोट्या गोळ्या करून तुपाबरोबर खाल्ल्याने अजीर्ण व वातगोळा दूर होतो.
  • हिंग उष्ण असल्याने पित्तप्रकोपाचा त्रास असणाऱ्यांनी हिंगाचे सेवन जरा जपूनच करावे.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

error: ओ शेठ