सुंदर त्वचेसाठी काही निवडक उपाय | Beauty tips in marathi

त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अतिप्रमाणात साखरेचे व चॉकलेटचे सेवन केल्यास चेहऱ्यावर पिंपल्स आणि मुरुमाची समस्या निर्माण होऊ शकते. त्वचेची काळजी घेतल्याने चेहऱ्यावरील समस्या दूर होण्यास मदत होते. त्यासाठी आपल्या काही सवयीमध्ये थोडा बदल केला पाहिजे. यामुळे त्वचेचा टोन सुधारण्यास मदत होते.

सुंदर त्वचेसाठी काही निवडक उपाय | Beauty tips in marathi

  1. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुतला पाहिजे तसेच चेहऱ्याचा मेकअप न काढताच झोपलो तर त्वचेचा पोत बिघडू शकतो.
  2. बरेच लोक सनस्क्रीन लावणे टाळतात. मात्र सनस्क्रीन त्वचेसाठी आवश्यक असल्यामुळे चेहऱ्याला दररोज सनस्क्रीन लावली पाहिजे. मग ऋतू कोणताही असो.
  3. आपल्या चेहऱ्यावर मुरूम असेल तर सतत चेहऱ्याला आणि त्या मुरूमाला हात लावणे टाळले पाहिजे. कारण असे केल्याने मुरुमाची समस्या वाढण्याची शक्यता असते. शिवाय त्या मुरमाचे डाग ही त्वचेवर कायमस्वरूपी राहू शकतात.
  4. जर तुम्हाला त्वचा स्वच्छ ठेवण्याची सवय असेल, तुम्हाला चेहरा स्वच्छ ठेवणे आवडत असेल तर ही अत्यंत चांगली बाब आहे. मात्र सतत चेहरा धुणे देखील चुकीचे आहे.
  5. चेहऱ्यासाठी आपण जी सौंदर्य उत्पादने वापरतो ती खरोखरच चेहऱ्याला सूट होतात की नाही एकदा चेक केले पाहिजे. कारण बऱ्याच वेळा सौंदर्य उत्पादनामुळे चेहरा अधिक खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे सौंदर्य उत्पादने वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.
  6. मॉइश्चरायझर त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी मॉइश्चरायझरचा नियमित वापर करणे फायद्याचे ठरू शकते.
  7. आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी झोप ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही व्यवस्थित झोप घेत नसाल तर त्वचेशी निगडित अनेक त्रास उद्भवू शकतात. अपुऱ्या झोपेमुळे त्वचा खराब होण्यास सुरुवात होते.
  8. आंघोळ झाल्यावर आपली त्वचा कोरडी करण्यासाठी जाड कपड्याने त्वचा पुसणे टाळा. मऊ सुती कपड्याने चेहऱ्यावरचे पाणी अलगद टिपणे त्वचेसाठी हितकर असते.
  9. चेहऱ्यावर शक्यतो कमी वेळ मेकअप ठेवा. जर मेकअप चेहऱ्यावर जास्त वेळ राहिला तर त्वचेवर पिंपल्स येण्याची शक्यता असते.
  10. दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर संपूर्ण चेहऱ्याला गुलाब पाणी लावा. यामुळे त्वचेचा टोन सुधारण्यास आणि त्वचा मुलायमदार होण्यास मदत होईल.

Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button