ब्रोकली आरोग्य सोबतच सौंदर्यासाठी पण खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला फिट आणि सुंदर दिसायचं असेल तर तुम्ही रोजच्या आहारात ब्रोकलीचा वापर करून करा.
आरोग्यदायी फायदे- Broccoli benefits for skin
दात आणि तोंडासाठी उपयुक्त-
ब्रोकली मध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे तुमच्या दाताचे आणि तोंडाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. ब्रोकली खाल्ल्याने तोंडाचा वास सुद्धा येत नाही. शिवाय यामुळे तुम्हाला तोंडाचा कॅन्सर होण्याचा धोका देखील कमी होतो. काही संशोधनानुसार कच्ची ब्रोकली खाल्ल्यामुळे तुमच्या तोंडातील दुर्गंधी कमी होते आणि तुमचे दात स्वच्छ राहण्यास मदत मिळते.
केस मजबूत होतात-
ब्रोकली मध्ये विटामिन बी आणि विटामिन सी असते त्यामुळे तुमचे केस मजबूत आणि दाट होतात. विटामिन सी मुळे केस गळण्याचे प्रमाण देखील कमी होतो. ब्रोकली मधील विटामिन ए मुळे तुमचे केस चांगले राहतात. त्यामुळे तुमच्या केसांची मुळं निरोगी आणि सशक्त होतात.त्यामुळे
केस चमकदार होतात-
ब्रोकली मधील तेलाच्या घटकामुळे तुमच्या केसाच्या मुळापर्यंत पोषण मिळते त्यामुळे तुमची केसाला खूप मदत होते. आणि यातील ओमेगा 9 फेट्टी ऍसिडचा परिणाम तुमच्या केसाच्या टेक्चरवर होतो.
एजिंगच्या खुणा कमी होतात-
एजिंग म्हणजे त्वचेवरच्या वार्धक्याच्या खुणा. वास्तविक म्हातारपण ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया. मात्र आज कालची बदललेली जीवनशैली आणि वाढता ताणतणाव, चिंता, काळजी, प्रदूषण याकडे नकळत होणाऱ्या सौंदर्यावर परिणाम होतो. ह्या सर्व गोष्टीमुळे तुम्ही वयाच्या आधीच फार म्हातारे सारखे दिसू लागतात म्हणजेच सुरकुत्या पडल्यासारखे दिसतात. मात्र एका संशोधनानुसार ब्रोकलीचा समावेश केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर अकाली म्हातारपण याच्या खुणा दिसत नाही.
अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते-
वातावरणातील ओझोन चा थर कमी झाल्यामुळे अतिप्रखर सूर्याच्या किरणांमुळे त्वचेचा कॅन्सर चा प्रमाण सध्या जास्त वाढलेला आहे. मात्र एका संशोधनानुसार ब्रोकली मुळेच त्वचेला सूर्याच्या अतिनील किरणांपासून होणारा धोका कमी झाल्याचा आढळून आलेलं आहे. त्वचेचे संरक्षण करण्यासाठी नियमित ब्रोकलीचा समावेश जेवणात केला पाहिजे.
Note – मित्रांनो, तूम्ही वैद्यकीय सल्ल्याशिवाय ही कृती करू नका.आशा करतो की Beauty Benefits of broccoli in marathi माहिती तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर. आणि तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुम्ही सोशल मीडियावर शेअर जरूर करू शकता.