तमाल नावाच्या झाडाच्या पानांना ‘तमालपत्र’ किंवा हिंदीमध्ये ‘तेजपत्ता’ म्हणतात. पदार्थांना आगळाच सुगंध प्राप्त करुन देण्याचे काम तमालपत्र करते.
तमालपत्र खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Bay leaf benefits in marathi
- तमालपत्र तीक्ष्ण, उष्ण, चिकट व हलके असते.
- तमालपत्राचा काढा प्यायल्याने घाम येतो व लघवीला होते.
- तमालवृक्षाची साल व पिंपळीचे चूर्ण मधातून चाटून खाल्ल्याने कफ येण्याचे बंद होते. सर्दी दूर होते तसेच पचनक्रियाही सुधारते. तसेच या मिश्रणामध्ये आल्याचा रस घालून खाल्ल्याने श्वसन रोगात फायदा होतो.
हे सुध्दा वाचा:– जिरे खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहे का?
- तमालवृक्षाची साल घेऊन त्याचे चूर्ण करावे व त्याचा लेप सांधे दुखत असताना त्यांवर द्यावा.
- अपचन, वात, उदरदुखी, वारंवार जुलाब होणे यामध्ये तमालपत्राचा फायदा होतो.
Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.