केळी खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Banana benefits in marathi

भारतामध्ये बारमाही मिळणारे फळ म्हणजे केळे, मंगलप्रसंगी केळीच्या खांबांचा उपयोग होतो. केळीच्या झाडाला येणाऱ्या केळफुलाची अत्यंत चविष्ट भाजी काही ठिकाणी आवडीने खाल्ली जाते. काही केळी पिवळट रंगाची, छोट्या आकाराची (वेलची), काही थोडी मोठी, हिरवट पिवळ्या रंगाची तर काही त्याहूनही मोठी (राजाळी) असतात.

केळी खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? | Banana benefits in marathi

  • पिकलेली केळी आरोग्यासाठी गोड, थंड, वीर्यवर्धक, बलकारक, रुचकर तसेच तृषाहारक असतात.
  • ज्यांना मलावरोधाचा त्रास आहे अशांनी परिपक्व केळ्याचे सेवन करावे.
  • केळ्यामध्ये पोषक घटकांचे प्रमाण खूप असल्याने शरीराची दुर्बलता दूर करण्यास ते मदत करते.
  • पिकलेली केळी तुपाबरोबर खाल्ल्याने पित्तविकारामध्ये फायदा होतो. तर जेवणानंतर रोज पिकलेली केळी खाल्ली असता शरीर धष्टपुष्ट बनते.
  • पिकलेली केळी मधात कालवून खाल्ल्याने काविळीच्या त्रासावर उतार पडतो.
  • लिंबाच्या रसाबरोबर केळी खाल्ल्याने मुरडा, अतिसार बरा होतो, तर दह्याबरोबर खाल्ल्याने जुलाब बंद होतो.
  • त्वचा भाजली असता त्यावर केळे कुस्करून लावल्याने शरीरदाह शांत होतो. कंड सुटली असता लिंबाच्या रसात कुस्करून लावल्याने शरीरदाह शांत होतो. कंड सुटली असता लिंबाच्या रसात कुस्करून जेथे कंड सुटली आहे त्या भागावर लेप द्यावा.
  • मूत्राशयाच्या विकारामध्ये केळ्यांचा उपयोग होतो.
  • केळफुलाची भाजी खाल्ल्याने आम नष्ट होतो व पोटातील जंत कमी होतात.

Note 1 – कच्ची केळी पचण्यास जड असतात. अतिशय पक्व केळी खाऊ नये. सर्दी झाल्यास केळ्याचे सेवन टाळावे. केळे खाल्ल्यावर पाणी पिऊ नये असे केल्याने बरेचदा पोटदुखी झाल्याचे जाणवते.

Note 2 – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button