प्रसिद्ध भारतीय कादंबरीकार अरूंधती रॉय | Arundhati Roy Biography in Marathi

प्रसिद्ध भारतीय कादंबरीकार व समाजसेविका अरूंधती रॉय यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६१ ला असाममध्ये झाला. त्या खिचन आई तसेच बंगाली हिंदू वडिलांची पुत्री आहेत. अरुंधतीचं बालपण आईसोबतच केरळात गेलं. त्यांची आई पण एक समाजसेविका होती. त्यांनी स्वतंत्र स्कूल उघडून मुलीला औपचारीक शिक्षण दिलं.

प्रसिद्ध भारतीय कादंबरीकार अरूंधती रॉय| Arundhati Roy Biography in Marathi

अरूंधती यांचा दाखला ‘स्कूल ऑफ आर्किटेक्चर’ मध्ये घातला. तिथेच त्यांची आणि जीरर्ड यांची भेट झाली, जे नंतर विवाहबद्ध झाले. ते त्या ठिकाणाचे फेलो स्टुडंट होते. दोघांनीही वस्तूकला सोडून दिली आणि गोव्याला गेले. त्यांना पोट भरण्यासाठी केक तयार करून विकावे लागले. हे लग्न चार वर्ष टिकलं.

अरूंधती एकदा दिल्लीला परतल्या. त्यांनी नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्समध्ये नोकरी धरली. किरायाच्या घरात त्या राहू लागल्या. याच दरम्यान त्यांना ‘मॅसी साहेबा साठी जनजातीय मुलीची भूमिका करण्याचा प्रस्ताव मिळाला. नंतर त्यांनी चित्रपट दिग्दर्शकासोबतच विवाह केला. या दरम्यान त्या इमारतीचे पुननिर्माण या विषयाचा अभ्यास करण्यासाठी इटालीला गेल्या.

पतीला सोबत घेऊन त्यांनी दूरदर्शनासाठी ‘बिनयन ट्री’ नावाची मालिका देखील तयार केली. त्यांनी टि. व्ही. साठी दोन स्क्री प्ले देखील लिहिले.शेखर कपूरची वादग्रस्त फिल्म ‘बॅडिटक्वीन’ ची कथा देखील त्यांनीच लिहिली होती. त्यानंतर अरूंधतीने आपला संपूर्ण वेळ लेखनासाठीच दिला. त्यानंतर जन्म झाला त्यांच्या ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ या पुस्तकाचा. वर्ष १९९७ मध्ये त्यांना त्यासाठी बुकर पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. वर्ष २००४ मध्ये त्यांना सिडनी पीस पुरस्कार देण्यात आला.

त्यानंतर त्यांनी राजकीय विषयावर लिहायला सुरूवात केली. त्यांनी नर्मदा बचाव आंदोलन, भारतीय परमाणू शस्त्र सारख्या विषयावर लिहिले. त्या जागतिकीकरण विरोधी आंदोलनात सक्रिय आहेत तसेच नवसाम्राज्यवादावर टीका करीत असतात.

Note: जर तुमच्याकडे About Arundhati Roy मध्ये अजून Information असेल, जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Arundhati Roy Biography in Marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि Sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button