प्रख्यात भारतीय चित्रकार अमृता शेरगिल यांच्या चित्राद्वारे प्रेम व देशबांधवाप्रति आपलेपणा जाणवतो.
अमृता शेरगिल यांचा जीवन प्रवास | Amrita Sher-gil Biography in Marathi
अमृता शेरगिल यांचा जन्म 1913 मध्ये हंगेरीत येथे झाला. त्यांचे वडील जन्मजात शिख तसेच आई हंगेरियन होती. आई-वडिलांना कलेमध्ये रस होता. त्यांचे वडील उमरावसिंह संस्कृतचे एक विद्वान होते तसेच आई मेरी आँटनी एक पियानो वादीका होती. अमृताचे बालपण हंगेरीमध्येच गेले. 1921 मध्ये त्यांचं कुटुंब शिमल्याला आलं. इथे आल्यावर चित्रकलेच्या प्रांतात अमृताने पहिले पाऊल टाकले. शिमल्यात अमृताच्या आईची भेट एक इटालियन मूर्तीकाराबरोबर झाली. 1924 मध्ये
ज्यावेळी ते इटालीत आले, अमृता आणि अमृताची आई, दोघीपण सोबतच होत्या. इटालीत अमृताला एका रोमन कॅथॉलीक संस्थेत पाठविण्यात आले. तिथे फारच कडक शिस्त होती. परंतु अमृताला इटालीच्या कलाकारांच्या कलेचं कौतूक करण्याची समजून, घण्याची संधी इथेच मिळाली.
1927 मध्ये अमृता भारतात आल्या व अविने बेकले यांच्याकडून चित्रकला शिकवू लागल्या. त्यांना वाटत होते की अमृताने वास्तवीक जगातल्या कोण्या एखाद्या व्यक्तीला आपला आदर्श म्हणून निवडावं. परंतु अमृताला हे मान्य नव्हतं.वयाच्या सोळाव्या वर्षी अमृता पॅरिसला गेल्या. तिथे त्यांनी कला विद्यापीठातून कलेचीडिग्री मिळवली.
फ्रान्समध्येच अमृताने चित्रकलेला गंभीपणे घ्यायला सुरूवात केली. त्यांचं सुरूवातीचं चित्र होतं ‘टोर्सी’. सर्वांनी त्यांच्या चित्राचं कौतूक केलं आणि त्यांना पॅरिसच्या ग्रँड सलूनची असोसिएट म्हणून निवडण्यात आलं.
1934 मध्ये अमृता भारतात आल्या व आपल्या स्वतःच्या शैलीतली चित्रं काढू लागल्या त्यांनी गरीब, ग्रामीण व शिकाऱ्यांना आपलं मॉडेल करून चित्रे काढली. दक्षिण भारताच्या प्रवासात असताना त्यांना साधेपणाचा साक्षात्कार झाला. ज्यांना तो आपल्या चित्रांमधून व्यक्त करायचा होता. 1938 मध्ये त्या हंगेरीला गेल्या आणि विवाहानंतर तिथेच राहू लागल्या.
Note: जर तुमच्याकडे About Amrita Sher-gil मध्ये अजून Information असेल, जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Amrita Sher-gil Biography in Marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही WhatsApp, Facebook आणि Sharechat वर Share करू शकता.