‘अल्जाइमर दिवस’ का साजरा केला जातो? आणि त्याची कारणे काय?| Alzheimer day information in marathi

नमस्कार मित्रांनो, आज आहे जागतिक अल्झायमर दिवस. 21 सप्टेंबर हा दिवस जागतिक ‘अल्झायमर दिन’ (Alzheimer day) म्हणून साजरा केला जातो. अल्झायमर विकारात खूप यातना दडल्या आहेत. अल्झायमर डिसीज म्हणजे काय, तो कोणी शोधून काढला, त्याची लक्षणे काय असतात, काय काळजी घ्यावी लागते, होऊ नये म्हणून काही उपाय करणे शक्य आहे का, आणि सुरूवात कधीपासून झाली हे सर्व जाणून घेऊया.

अल्जाइमर दिवस का साजरा केला जातो आणि त्याची कारणे काय?| Alzheimer day information in marathi

ॲलोइस अल्झेमर नावाच्या एका जर्मन डॉक्टरने 1906 साली या आजाराचा शोध लावला होता. त्यामुळे याला अल्झायमर डिसीज असे नाव देण्यात आले. मेंदूतील पेशींची विचित्र अशी गुंतागुंत अशा अवस्थेत एका मृत स्त्रीचा मेंदूचा त्यांनी अभ्यास केला. स्मरणशक्तीच्या विचित्र लक्षणांमुळे त्या स्त्रीचा मृत्यु झाला होता. त्या लक्षणांचा संबंध तिच्या मेंदूच्या रचनेशी असल्याचा तर्क करणारा हा जगातील पहिला शास्त्रज्ञ म्हणून ओळखला गेला. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास अल्झायमर डिसीज म्हणजे विसरभोळेपणा वाढत जातो. पहिले पहिले नाव विसरणे नंतर नाती विसरणे, जेवण खाणे विसरणे अशाप्रकारे लक्षणांमध्ये वाढ होत जाते.

सुरुवातीला घरातल्या सर्वांना विश्वास बसत नाही की हि व्यक्ती जाणून बुजून विसरते का, खरचं विसरते. हा अगदी थट्टा मस्करीचा विषय होतो. रोगाचे महत्व कळू लागले की, डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते. वास्तविक तेव्हा फार उशीर झालेला असतो. कारण अल्झेमर्सची सुरुवात मेंदूमध्ये झाल्यानंतर जवळपास दहा वर्ष उलटल्यानंतर मगच सुरुवातीची लक्षणे दिसू लागतात. असा शास्त्रज्ञांचा अभ्यास आहे. 65 वर्षे वया नंतर शेकडा 20 टक्के लोकांमध्ये अल्झायमर होण्याची शक्यता असते. असा निष्कर्ष अभ्यासातून काढण्यात आला आहे.

काय आहे अल्जाइमर थोडक्यात जाणून घेऊया?

अल्झायमर (Alzheimer’s Disease)  हा आजार विसरण्याशी संबंधित आहे. या आजारांमध्ये स्मरणशक्ती कमी होणे, निर्णय न घेऊ शकणे, बोलण्यात अडचण येणे किंवा यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक समस्या निर्माण होणे. ही कारणे आहेत. रक्तदाब, मधुमेह, आधुनिक जीवनशैली आणि डोक्यावर जखम झाल्यास हा आजार होण्याची शक्यता वाढते. या आजारावर अजून काहीही नक्की असा उपाय नसून सुरुवातीच्या काळात नियमीत तपासणी आणि उपचाराने यावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. आज आम्ही तुम्हाला असे संकेत सांगणार आहोत ज्या अल्झायमर झाल्याकडे इशारा करतात.

स्मरणशक्ती कमी होणे

नाव विसरणे, वस्तू हरवणे, ठरवलेल्या गोष्टी विसरणे, शब्द लक्षात न ठेवू शकणे, गोष्टी शिकण्यात आणि त्या लक्षात ठेवण्यात अडचणी होणे या गोष्टी असतात. या आजाराने तुमची पूर्ण स्मरणशक्ती हळू हळु पुसली जाऊ शकते. त्यासोबतच तुम्ही कुणालाही ओळखू शकत नाहीत. 

निर्णय न घेणे

हा आजार झाला असेल तर निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. म्हणजेच तुम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. निर्णय घेताना अनेक अडचणी येऊ शकतात. 

शारीरिक नियंत्रण समस्या

शरीरावर नियंत्रण न राहिल्याने तुम्ही पडूही शकता किंवा जेवण तयार करणे, ड्रायव्हिंग करणे, घरातील इतर कामे करतांना अनेक अडचणी येऊ शकतात. आजार जास्तच वाढला असेल तर रोजची कामे जसे की, आंघोळ करणे, कपडे घालने, जेवण करणे, टॉयलेटला जाणे यांसारखी कामे कुणाच्याही मदतीशिवाय करता येत नाही.

अंकांची ओळख न होणे

या आजारामुळे तुम्हाला अक्षरांची किंवा अंकांची ओळख किंवा हिशोब करण्यास त्रास होऊ शकतो.

हे वाचा- जागतिक पर्यावरण दिन मराठी माहिती

तारीख, वेळ आणि ठिकाण विसरणे

हा आजार असल्यास वेळ, तारीख आणि दिवस तसेच ओळखीची ठिकाणेही लक्षात राहत नाहीत. यात घराचा पत्ताही विसरु शकता. आपण काय काम करतो हेही विसरु शकतो.

बोलण्यात अडचण येणे

हा आजार झाल्यास एकही भाषा नीट बोलता येत नाही. तसेच तुम्हाला वाटतं ते शब्दात व्यक्त न करता येणे किंवा लिखित अक्षरे समजण्यासही अडचण येऊ शकते.

Note – जर तुम्हाला Alzheimer day information in marathi हि माहिती आवडली असेल तर तुम्ही Facebook, instagram, helo आणि twitter वर शेअर करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button