नोबेल पुरस्काराचे जनक अल्फ्रेड नोबेल यांच्या जीवनाबद्दल माहिती |Alfred Nobel biography in Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण नोबेल पुरस्काराचे जनक अल्फ्रेड नोबेल (Alfred Nobel) यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत. अल्फ्रेड नोबेल यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय गूढ असे होते. ते अतिशय साधे, विरक्त व तपोनिष्ठ आयुष्य जगले. त्यांनी मिळविलेल्या अमाप संपत्तीतूनच जगातील लोकप्रिय आणि प्रतिष्ठित ‘नोबेल’ पुरस्काराचा जन्म झाला. त्यांनी आपली सर्व संपत्ती मानवीकल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करून जगात असे काम करण्याची प्रेरणा सतत निर्माण होत राहावी यासाठी वापरली. सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या जागतिक दर्जाच्या संशोधकांचा, साहित्यिकांचा आणि शांततेसाठी काम करणाऱ्यांचा गौरव करण्यासाठी आपल्या संपत्तीचा उपयोग व्हावा, अशी शेवटची इच्छा बाळगणारे अल्फ्रेड नोबेल जगभरात अजरामर झाले.

नोबेल पुरस्काराचे जनक अल्फ्रेड नोबेल | Alfred nobel biography in marathi

अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म 21 ऑक्टोबर, 1833 रोजी स्वीडनमधील स्टॉकहोम येथे झाला. ते रसायनशास्त्रज्ञ, इंजिनिअर आणि उत्पादक होते. त्यांनी डायनामाइट आणि इतर शक्तिशाली स्फोटकांचे शोध लावले आणि नोबेल फाउंडेशनची स्थापना केली. जगात अतिशय प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या, शांततेसाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी केलेल्या संशोधनाला दिल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय नोबेल पुरस्काराची सुरुवात केली. त्यांची आई कॅरोलीना आणि वडील इमॅन्युएल हेदेखील संशोधक आणि अभियंता होते.

लहानपणी अल्फ्रेड सतत आजारी पडत असत; परंतु आईचे अल्फ्रेडवर अतिशय प्रेम होते. तो लहानपणापासूनच अतिशय हुशार, चिकित्सक होता. त्याला स्फोटकांबद्दल खूपच आकर्षण होते आणि अभियांत्रिकीचे ज्ञान त्याने आपल्या वडिलांकडूनच मिळविले होते. सुरुवातीला अनेक व्यवसायांमधून झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे इमॅन्युएल यांनी 1837 साली रशियातील पीट्सबर्ग येथे स्थलांतर केले.

तेथे मात्र खाणीतील स्फोट आणि त्यासंबंधीच्या हत्यारांच्या उत्पादनात त्यांनी प्रचंड यश मिळविले. त्यांनी अल्फ्रेडला उत्तम शिक्षण दिले. अल्फ्रेडलाही अभ्यासात आणि शास्त्रीय प्रयोगात विशेष रस होता. वयाच्या 16 व्या वर्षीच तो एक कार्यक्षम केमिस्ट बनला. त्याचबरोबर इंग्रजी, फ्रेंच, जर्मन आणि रशियन या भाषांवरही त्यांनी प्रभुत्व मिळविले. स्वीडिश तर त्यांची मातृभाषाच होती.

अल्फ्रेड नोबेल यांच्या जीवनाबद्दल माहिती | Alfred nobel information in marathi

1850 साली त्यांनी रशिया सोडले. एक वर्ष पॅरिसमध्ये राहून त्यांनी रसायनशास्त्राचा अभ्यास केला. नंतर अमेरिकेत जाऊन त्यांनी जॉन एरिक्सन या सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मार्गदर्शनाखाली काम केले. त्यानंतर परत त्यांनी आपल्या आई-वडिलांबरोबर सैनिकी अवजारे बनविण्याच्या कारखान्यात काम करायला सुरुवात केली. युद्धानंतर पुन्हा एकदा व्यवसाय दिवाळखोरीमुळे बंद करावा लागला आणि हे कुटुंब मायदेशी परतले. मायदेशी आल्यावर अल्फ्रेड यांनी आपले स्फोटकांचे संशोधन सुरूच ठेवले. 1863 साली त्यांनी ‘डिटोनेटरचा’ शोध लावला, तर 1865 साली ‘ब्लास्टिंग कॅप’ विकसित केली. एका स्फोटात त्यांना आपला भाऊ गमवावा लागला. तरीही धैर्याने त्यांनी आपले संशोधन पुढे चालूच ठेवले. ते आपल्या उत्पादन विभागाचा विस्तारही करीत राहिले.

1867 साली त्यांना अपघातानेच ‘नायट्रोग्लिसरिन’ आणि ‘किसेलगर’ यांच्या संयोगाने एका महत्त्वाच्या नवीन रसायनाचा शोध लागला. या पदार्थाचे नामकरण त्यांनी ‘डायनामाइट’ (फ्रेंच भाषेत पावडरला डायनामाइट असे म्हणतात) असे केले. या पदार्थाचे त्यांनी अमेरिका आणि ब्रिटनकडून पेटंटही मिळवले. या शोधामुळे अल्फ्रेड नोबेल जगप्रसिद्ध झाले. डायनामाइटचा उपयोग बोगदे खणण्यासाठी, पाट तयार करण्यासाठी, रेल्वे रूळ तयार करण्यासाठी संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात होऊ लागला. डायनामाइटच्या उत्पादनाचे आणि विक्रीचे प्रचंड मोठे जाळे त्यांनी 1870 ते 1880 या काळात जगभर सर्वत्र पसरवले.

आपले संशोधन त्यांनी यापुढेही सतत चालूच ठेवले. त्यातूनच 1887 साली ‘बॅलिस्टाइट’ या शक्तिशाली आणि सोईस्कर स्फोटकाचा शोध लागला. याच काळात त्यांच्या भावानेही तेलक्षेत्रातून प्रचंड संपत्ती गोळा केली होती. स्वतःचे संशोधन, उत्पादन आणि कंपन्यांमधील गुंतवणूक यांच्या साहाय्याने ते प्रचंड संपत्तीचे मालक झाले. 1893 साली त्यांनी स्वीडनमधील सैनिकी अवजारे, शस्त्रास्त्रे यांच्या उत्पादनात रस घ्यायला सुरुवात केली. त्यातूनच जगप्रसिद्ध ‘बोफोर्स’ उत्पादनाची निर्मिती सुरू झाली. स्फोटकांबरोबरच अल्फ्रेड यांनी सिल्क, इत्यादींसारखे बरेच शोध लावले. वेगवेगळ्या देशांत त्यांच्या नावाने सुमारे 355 पेटंट्स आहेत.

नोबेल पुरस्काराचा जन्म | Nobel prize history in marathi

1895 साली त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि 10 डिसेंबर, 1896 रोजी मेंदूतील रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या स्फोटके आणि दारूगोळा तयार करणाऱ्या 90 कारखान्यांचे जाळे जगभर पसरले होते. अल्फ्रेड नोबेल यांनी 27 नोव्हेंबर रोजी पॅरिस येथे आपल्या मृत्यूनंतरचे त्यांचे इच्छापत्र तयार करून स्टॉकहोमच्या बँकेत ठेवले होते. ते त्यांच्या कुटुंबीयांना, मित्रांना, आणि सर्वसामान्य जनतेलाही अतिशय आश्चर्यकारक ठरले.

आपल्या सर्व संपत्तीचा विनियोग एका ट्रस्टद्वारे मानवीकल्याण करणाऱ्या संशोधकांचा, साहित्यिकांचा आणि शांततेसाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी करावा अशी त्यांची शेवटची इच्छा होती. यावरून ते लोककल्याणाच्या बाबतीत अतिशय उदारमतवादी होते हे स्पष्ट झाले. अल्फ्रेड नोबेल यांनी मागे ठेवलेल्या अमाप संपत्तीतूनच जगातील सर्वांत लोकप्रिय आणि सन्मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘नोबेल’ पुरस्काराचा जन्म झाला.

अल्फ्रेड नोबेल अतिशय विसंगत आणि विरोधाभास असणारे गूढ व्यक्तिमत्त्व होते. अत्यंत विलक्षण बुद्धिमत्ता; परंतु एकटेपण असलेले, अर्धवट निराशावादी तरीही कल्पक व ध्येयवादी व्यक्तिमत्त्व होते. ज्यांनी आधुनिक युद्धात वापरली गेलेली अतिशय शक्तिशाली स्फोटके निर्माण केली आणि त्याचबरोबर त्यातून मिळालेली सर्व संपत्ती मानवीकल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करून जगात असे काम करण्याची प्रेरणा सतत निर्माण होत राहावी यासाठी वापरली.

अशा जागतिक कीर्तीच्या सन्मानाचेही ते जनक ठरले. मृत्युपत्रातील काही तांत्रिक अडचणींमुळे पहिले नोबेल पारितोषिक देण्यास 1901 साल उजाडले. एकीकडे शक्तिशाली स्फोटकांचा निर्माता आणि दुसरीकडे नोबेल पुरस्काराचा जनक हे समीकरण विसंगत वाटण्याजोगे असले तरीही आपण स्वबळावर मिळविलेली संपत्ती जनहितार्थ काम करणाऱ्यांचा बहुमान करण्यासाठी वापरणे हे एक विलक्षण औदार्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.

Note: जर तुमच्याकडे About AAlfred nobel मध्ये अजून Information असेल, जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Alfred nobel in Marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि Sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button