असा लावला ‘ॲलेक्झांडर बेल’ यांनी टेलिफोनचा शोध…| Alexander graham bell information in marathi

तंत्रज्ञानाच्या प्रगतीने आज आपलं आयुष्य सुखकर झालं आहे. टेलिफोन हा तंत्रज्ञानाचा असाच अविष्कार आहे. टेलिफोनमुळे आपली अनेक कामे सोपी झाली. आपल्याला वरदान ठरलेल्या या टेलिफोनचा शोध लावला ॲलेक्झांडर ग्रॅहम बेल याने (alexander graham bell invented the telephone). या टेलिफोनची बेल पहिल्यांदा खणखणली तो दिवस म्हणजे 2 जून 1875. बरोबर 147 वर्षं झाली या प्रसंगाला. याच निमित्ताने आपण माणसामाणसाच्या तारा जोडणाऱ्या या टेलिफोनच्या शोधाविषयी जाणून घेऊया.

असा लावला ॲलेक्झांडर बेल यांनी टेलिफोनचा शोध…| Alexander graham bell information in marathi

पूर्वीच्या काळात संदेशवहनासाठी कबुतरांचा वापर केला जात असे किंवा माणसे स्वतः निरोप्या म्हणून जात असत. पण ॲलेक्झांडर ग्रॅहम बेल या शास्त्रज्ञाने समस्त मानव जातीवर उपकारच केले असंच म्हणायला हवं. 1867 मध्ये, बेल आणि त्याचे कुटुंब त्याच्या 2 मोठ्या भावांच्या मृत्यूच्या पश्चात लंडनला स्थायिक झाले. जेणेकरून ॲलेक्झांडर आणि त्याचा एक भाऊ चांगल्या शाळांमध्ये शिकू शकतील. लंडनला जाण्यापूर्वी, बेलने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आवाज पाठवण्यासाठी विद्युत प्रवाह वापरण्याचा प्रयोग केला होता. त्याने त्याच्या सॉमरसेट कॉलेजच्या खोलीपासून दुसऱ्या इमारतीतील मित्राच्या खोलीपर्यंत तार लावली. त्याच वर्षी नंतर, बेलच्या दुसऱ्या भावाचे निधन झाले.

पुढे ॲलेक्झांडर आणि त्याचे वडील दौऱ्यावर होते. इंग्रजी महाविद्यालयांमध्ये जाऊन सांकेतिक भाषा आणि लीप रीडिंगच्या (म्हणजे ओठांच्या हालचालीवरून समोरचा व्यक्ती काय बोलतो आहे ते ओळखणे) प्रगत तंत्रांची प्रात्यक्षिके करत होते. बेल आणि त्याच्या वडिलांनी एक प्रयोगशाळा तयार केली होती जिथे ते त्यांचे प्रयोग करत होते. त्यांच्या वडिलांनी मूक बधिरांना प्रशिक्षित करण्यासाठी एका विशिष्ट तंत्राचा विकास केला होता. त्यांनी अशी अनेक तंत्रे विकसित केली होती जी देशभरातील संभाषण तज्ञांचे लक्ष वेधून घेत होती.

1870 मध्ये ॲलेक्झांडर यावर झपाटल्यासारखे काम करत होते. त्यांच्या पालकांना आपला आहे तो मुलगा गमावायचा नव्हता. म्हणून त्यांनी इंग्लंडमधील सर्व काही विकून कॅनडाला जाण्याचा निर्णय घेतला. क्यूबेक प्रांतातील बेल्स पॅरिस, ओंटारियो इथे ते स्थायिक झाले. अलेक्झांडर यांनी ताबडतोब सर्व साहित्य जमवून एक नवीन प्रयोगशाळा सुरु केली आणि त्यांचे प्रयोग चालू ठेवले. कॅनडातील बेलच्या पहिल्या कामगिरींपैकी एक म्हणजे मोहॉक जमातीची अलिखित भाषा लिखित म्हणजे लिपी स्वरूपात आणली आणि पुनरुज्जीवित केले. मोहॉक जमातीने अलेक्झांडरला त्याच्या कर्तृत्वासाठी सन्मानित केले आणि त्याच्या कामगिरीमुळे त्याला उत्तर अमेरिकेत प्रसिद्धी मिळाली.

पुढे अलेक्झांडर बोस्टन विद्यापीठात वक्तृत्व विषयात प्रोफेसर बनले आणि त्यांनी ओंटारियोमधील त्यांचे घर आणि बोस्टन या दोन ठिकाणीच वेळ व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. 1873 पर्यंत, बेलच्या कामाच्या सवयींचा आणि प्रवासाच्या वेळापत्रकाचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. त्यांनी बोस्टनमध्ये राहून विद्युत प्रवाह वापरून ध्वनीचं प्रसारण करण्याचे काम सुरू करण्याचे ठरवले, जे त्यांनी आधी लंडनमध्ये केलेले होते. त्याने टेलिग्राफ म्हणजे तार यंत्रावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना प्राध्यापकी सोडून आराम करावा लागला. त्यांना शिकवणे आणि प्रवास करणे दोन्ही थांबवायची अजिबात इच्छा नव्हती, पण त्यांना हे सर्व थांबवणे भाग पडले.

2 जून 1975 रोजी अलेक्झांडर यांनी पाण्यामध्ये कंप निर्माण करणाऱ्या सुईच्या माध्यमातून ध्वनी प्रसारित करण्याचा प्रयोग केला ज्यामुळे विद्युत प्रवाहात बदल होत होता. हाच विद्युत प्रवाहातील बदल आवाज प्रसारण करत होता. आवाज प्रवाहित करण्यासाठी हेच आवश्यक होते. पुढे यावर आणखी संशोधन करून जगाला एक सुंदर भेट दिली. 6 मार्च 1876 या दिवशी हे पाण्यावर आधारित उपकरण वापरून अलेक्झांडर यांनी त्याच उपकरणाच्या ठेवलेल्या खोलीच्या बाजूच्या दुसऱ्या खोलीत ऐकत असलेल्या त्याच्या सहाय्यक थॉमस वॉटसनला, “वॉटसन, इथे या, मला तुम्हाला भेटायचे आहे,” असे शब्द उच्चारले. हाच होता टेलिफोनचा जन्म. हा संदेश केवळ वॉटसन यांनाच नव्हता तर हा पुढे येणाऱ्या अनेक क्रांतिकारी बदलांचा संकेत होता.

अलेक्झांडर यांना 7 मार्च 1876 रोजी टेलिफोन या नवीन उपकरणासाठीचे पेटंट देण्यात आले. खरंतर एलिशा ग्रे नावाच्या एका संशोधक महिलेने 14 फेब्रुवारी 1876 रोजी अशाच प्रकारच्या शोधाचे पेटंट मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु अमेरिकी पेटंट संस्थेने अलेक्झांडर यांना पेटंट देण्याचा निर्णय घेतला व तो आजही कायम आहे. यावरूनच इतिहासकार आणि ग्रे कुटुंबातील सदस्यांमधील यावरून झालेला वाद अजूनपर्यंत खदखदत आहे.

हे सुध्दा वाचा:- जालियनवाला बाग हत्याकांडाचा इतिहास तुम्हाला माहित आहे का?

ऑगस्ट 1876 मध्ये, पाच मैलांच्या अंतरावर असलेल्या दोन टेलिग्राफ कार्यालयांचा वापर करून अलेक्झांडर यांचा त्यांच्या टेलिफोनचे प्रात्यक्षिक दाखवता आले. केवळ विद्यमान टेलिग्राफ लाइन्स वापरून, त्यांनी जगातील पहिला फोन कॉल करून आश्चर्यचकित करून सोडले. त्या वर्षाच्या उत्तरार्धात, अलेक्झांडर आणि त्याच्या आर्थिक पाठिराख्यांनी टेलिफोनचे पेटंट वेस्टर्न युनियन कंपनीला विकत घेण्याची ऑफर दिली, परंतु वेस्टर्न युनियनने टेलिफोनला एक निरुपयोगी खेळणी म्हणून फेटाळून लावले व याचं कधीही काहीही होणार नाही, असे सांगितले यामुळे बेल आणि त्याच्या भागीदारांना टेलिफोन पेटंट स्वतःसाठी ठेवण्याची प्रेरणा मिळाली आणि यापुढे टेलिफोनने इतिहास घडवला.

आज मोबाईलमध्ये वापरली जाणारी यंत्रणा ही याच टेलिफोनच्या संशोधनाचा पुढचा टप्पा आहे. आज सगळ्याच्या हातात मोबाईल असला तरी टेलिफोनने घडवलेली क्रांती आपण कधीही विसरू शकणार नाही. त्या खणखणणाऱ्या आवाजानेच त्याचे शोधकर्ता ॲलेक्झांडर ग्रॅहम बेल (Alexander graham bell) अमर झाले आहेत. त्यांच्या कार्यास देऊ तेवढे धन्यवाद कमीच असतील.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment


close button