लेखिका अगाथा क्रिस्टी यांच्या जीवनाबद्दल माहिती | Agatha Christie biography in Marathi

अगाथा क्रिस्टी (Agatha Christie) यांचा जन्म 15 सप्टेंबर 1980 ला इंग्लंडमध्ये झाला. अगाथा मेरी क्लारिसा मिलर तिनही भावंडात लहान होत्या. त्या दहा वर्षाच्या असतानाच त्यांच्या आई त्यांना सोडून गेल्या. त्यांना औपचारिक शिक्षण मिळालं नाही. आई तसेच गव्हर्ननेंस घरीच शिकवत. 1900 मध्ये संगीताचे शिक्षण देण्याबरोबरच लेखनासाठी देखील प्रोत्साहित केले.

लेखिका अगाथा क्रिस्टी यांच्या जीवनाबद्दल माहिती | Agatha Christie biography in Marathi

24 डिसेंबर 1914 ला वयाच्या चोविसाव्या वर्षी त्यांचा विवाह आर्ची यांच्याशी झाला. पहिल्या महायुद्धादरम्यान क्रिस्टीने जखमी लोकांची सेवा केली. त्यांच्या दुःखाने व कष्टाने क्रिस्टीच्या ह्रदयला द्रवित केलं. तिथेच त्यांना अनेक प्रकारच्या रोगांची व विषयांची माहिती मिळाली जी त्यांच्या लेखनाचा भाग बनली.

त्यावेळी त्यांनी आपली पहिली कादंबरी ‘द मिस्ट्रीअस अफेअर्स स्टाईल्स’ लिहिले होते, ही कादंबरी हातोहात विकल्या गेली.1928 ला आर्ची बरोबर काडीमोड झाल्यावर अगाथा फ्रान्स, बगदाद, इराक व मेसोपोटमियाच्या दौऱ्यावर निघाल्या. दुसऱ्या दौर्‍यात त्यांची भेट पुरातत्त्वज्ञ सर मॅक्स एडगर यांच्याशी झाली. पुढे सप्टेंबर 1930 मध्ये त्यांनी विवाह केला.

1960 मध्ये मॅक्सला ब्रिटिश साम्राज्यांच्या कमांडरचा सन्मान मिळाला व त्यांना पुरातत्व कार्यासाठी ‘नाईट’ ही उपाधी देखील देण्यात आली. क्रिस्टीला देखील आपल्या जीवनकाळात अनेक सन्मान व पुरस्कार मिळाले. त्यापैकी ‘द मिस्ट्री राईटर्स ऑफ ब्रिटिश आदी प्रमुख होते. 1974 मध्ये क्रिस्टी शेवटच्या लोकांसमोर आल्या. त्या आपला वेळ घरीच घालवत असत. 1976 मध्ये त्यांचा देहांत झाला.क्रिस्टीचें करियर 50 वर्षांपेक्षा जास्त राहिले. त्यांच्या पुस्तकांचे इतर भाषेतही भाषांतर झाले तसेच त्यांना आजही मोठ्या प्रमाणात वाचले जाते.

त्यांच्या लेखनाने लेखकांना ही प्रभावित केले आहे. रहस्यमय गुन्हेगारी बद्दल लिहित असतानाच त्यांनी बीबीसी रेडिओसाठी कथा वाचन केले होते. त्यांनी रोमान्स, नाटक व कविता आधी प्रकारही लिहिले. त्यांची ‘द ए बी सी मर्डर्स’, ‘टेन लिटील इंडियन्स’, ‘द माऊसट्रॅप’, ‘हिकरी डिकरी डॉक’, ‘विटनेस फॉर प्रॉसिक्युशन’, ‘मर्डर ऑन दि ओरियन्ट एक्सप्रेस’, ‘डेथ ऑन नाहल’ आदी प्रमुख पुस्तके आहेत.

Note: जर तुमच्याकडे About Agatha Christie मध्ये अजून Information असेल, जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Agatha Christie in Marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही  WhatsApp, Facebook आणि Sharechat वर Share करू शकता.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button