पचनक्रियेत जठराग्नीमुळे पाचकरस तयार होते, ज्यामुळे अन्नाचे विघटन होण्यास मदत होते आणि पचनसंस्था चालते. असे हे पाचकरस बनवण्याचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा वाढले तर या परिस्थितीला ॲसिडिटी असे म्हणतात.
ॲसिडीटी होण्याची कोणकोणते कारणे आहेत?
- आहारात अति तिखट अन्नपदार्थांचा समावेश.
- मांसाहार, फास्टफूड खाणे
- तणाव
- काही औषधे उदा. पेन किलर
- दारूचे सेवन करणे
ॲसिडिटी कमी करण्यासाठी या आहाराचा समावेश करा | Acidity Home Remedy
- रोज एक ग्लास कोमट पाणी प्यावे.
- आंबट फळे जसे संत्री, मोसंबी, अननस, सफरचंद इ. खाणे टाळावे. जास्त आंबट फळांमुळे ॲसिडिटी निर्माण होते. त्याऐवजी केळी, चिक्कू, टरबूज खावे. टरबूजाचा रस हा ॲसिडिटीत आरामदायी ठरतो.
- तेलकट, तूपकट पदार्थ खाणे टाळावे. तळलेले पदार्थ पचवण्यासाठी शरीरास अतिरिक्त ॲसिड निर्माण करावे लागते.
- मांसाहार टाळावा. कारण ते पचण्यास जड असते. त्याच्या पचनासाठी व विघटनासाठीदेखील शरीरास अतिरिक्त ॲसिड निर्माण करावे लागते.
- मांसाहारामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. प्रोटीन हे अमिनो ॲसिडस्चा समूह आहे. हे अमिनो ॲसिड (amino acid) दुसऱ्या पदार्थाबरोबर विघटित होतात आणि ॲसिडिटीचे प्रमाण वाढते.
- जेव्हा भूक लागते तेव्हा जेवण करणे योग्य आहे. भूक असताना न जेवणे व नंतर जेवणे, यामुळेही ॲसिडिटीची समस्या निर्माण होते. दर 3 ते 4 तासात थोडेसे काही खात राहावे.
- रेडी टू इट असे जे काही पदार्थ बाजारात मिळतात. त्यात ॲसिड रेग्युलेटरचा (Acid Regulater) वापर केला जातो. म्हणून असे पदार्थ खाल्ल्यानंतर ॲसिडिटी वाढते. यापेक्षा घरचे ताजे अन्न खावे.
- शिळे अन्न, ब्रेड, पिझ्झा, बर्गर असे पदार्थ पचवण्यास जड असतात. म्हणून असे पदार्थ खाणे टाळावे.
- भरपूर पाणी प्यावे. कारण शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाले तरीही ॲसिडिटी वाढते.
- सिगरेट पिणे, दारू पिणे, अति जास्त प्रमाणात चहा व कॉफी पिणे यामुळे शरीरात ॲसिडिटीचे प्रमाण वाढते आणि ॲसिडिटीची समस्या उद्भवते.
- तणावामुळे संपूर्ण शरीरसंस्था विसकळीत होते. खूपदा काही शरीरप्रकृतींमध्ये तणाव घेतल्यामुळे अतिरिक्त ॲसिड निर्माण होते. तणाव दूर करण्यासाठी शवासनासारखी आसने उपयुक्त असतात.
- साजूक तूप हे पित्त शमवण्याचे कार्य करते. म्हणून रोज 1-2 चमचे साजूक तूप खावे. हे तूप दुधात अथवा भातात टाकून खावे. पोळीबरोबरही खाऊ शकता, परंतु पोळी भाजताना तूप लावू नये. पोळी गॅसवरून खाली घेतल्यानंतर तूप लावून खावे. (वजनावर नियंत्रण करत असाल तर हा प्रयोग उपयोगात आणू नये. इतर पर्याय उपयोगात आणावेत.
- थंड दूध, नारळपाणी, सरबत हे ॲसिडिटी कमी करण्यास मदत करतात.
- नियमित व्यायाम करावा आणि जेवणानंतर शतपावली करावी.
- ॲसिडिटीच्या विरुद्ध अल्कलाईन असते. म्हणून जेवणात अल्कलाईन घटक असणारे पदार्थ खावेत. उदा. काकडी,केळी, पालक, कडधान्ये, बीट, गाजर, फ्लॉवर, कोबी, घोसावळं, दोडका इ.
- स्वतःच्या शरीराचे निरीक्षण स्वतःच करावे. तुम्हाला कोणत्या पदार्थांमुळे ॲसिडिटी होते आणि कोणत्या पदार्थांमुळे तुमची ॲसिडिटी कमी होते ते तुम्हालाच निरीक्षणातून कळून येईल. उदा. तूरडाळ, मेथी, पोहे, बाजरी असे पदार्थ सेवन केल्यानंतर काही शरीरप्रकृतीत ॲसिडिटी होते तर काही शरीरप्रकृतीत । होत नाही.
Note – आरोग्यविषयक पोस्टमध्ये दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.