‘अमिताभ बच्चन’ यांच्या यशाचं रहस्य सांगणाऱ्या या गोष्टी तुम्हाला माहित आहे का? | 8 tips by Amitabh Bachchan on being successful in marathi

अमिताभ बच्चन यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला भरभरुन योगदान दिलं आहे. त्यांच्या अभिनयाचे चाहते केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात पसरले आहेत. अर्थपूर्ण चित्रपट, ह्रदयस्पर्शी अभिनय, संवादकौशल्य, भारदस्त आवाज सगळ्याच बाजूंनी त्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. याच जोरावर यशाची उंची त्यांनी गाठली आहे. आजही वृद्धत्व आलं असतानाही ते कार्यरत आहे. अशावेळी नेमकं त्यांच्या यशाचं रहस्य काय असा प्रश्न आपल्याला पडतो. त्यामुळे आज या लेखातून आपण त्याचविषयी जाणून घेणार आहोत.

‘अमिताभ बच्चन’ यांच्या यशाचं रहस्य सांगणाऱ्या या गोष्टी तुम्हाला माहित आहे का? | 8 tips by Amitabh Bachchan on being successful in marathi

1. शिकत रहा

ज्ञानी व्यक्ती नेहमी आदराचं स्थान मिळवतो. कारण ज्ञान ते कवच आहे जे येणाऱ्या आव्हानांपासून तुमचा बचाव करेल. इतर कोणत्याही शस्त्राची तुम्हाला गरज भासणार नाही. कारण ज्ञान हेच खूप मोठं शस्त्र आहे. ज्ञानाच्या जोरावर यशाची उंची गाठण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही, यावर अमिताभ बच्चन यांचा विश्वास आहे.

2. सुरुवात केली की विचलित होऊ नका

जी गोष्ट आपल्याला अगदी आतून करावीशी वाटत आहे, ती जरुर करावी आणि त्याला सुरुवात केली की कधीही विचलित होऊ नये. मनात संभ्रम निर्माण झाला तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ज्याच्याकडे योग्य दृष्टी, समज आणि कल्पना आहे ती व्यक्ती तुम्हाला काही मदत करु शकते. कोणताही प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्यांच्याशी चर्चा करा आणि एकदा तुम्ही सुरुवात केलीत की, विचलित होऊ नका असा सल्ला बिग बी देतात.

3. कठोर परिश्रम करा

जे लोक सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दरम्यान झोपतात ते कदाचित विजेते होतीलही पण कमावलेलं टिकवू शकणार नाहीत. त्यामुळे लवकर उठा, वेळेवर काम करा, असा सल्ला बच्चन यांनी दिला आहे. तुम्हाला ज्ञान मिळवायचे असेल तर सूर्याच्या पुढे चालावे लागेल आणि हे आव्हान तुम्हाला पार पाडलं तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही असा विश्वास अमिताभ यांना वाटतो.

4. तुमचे काम अनुभवा

आपल्या हातात असलेल्या कामाला आपले १०० टक्के देणं, त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं आणि काम अनुभवणं अतिशय गरजेचं आहे. तरच आपल्याला अपेक्षित फळ मिळेल, असा विश्वास ते व्यक्त करतात. कामाला पूर्ण न्याय आपण देऊ शकलो तरच ते काम यशस्वी होऊ शकतं.

5. टीमवर्कवर विश्वास ठेवा

तुमच्या प्रयत्नांच्या परिणामाची काळजी करू नका, फक्त तुमचे सर्वोत्तम द्या आणि त्यातून जे काही साध्य कराल त्याची प्रशंसा करा. बच्चन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ते दिग्दर्शक, निर्माते आणि संपूर्ण टीमसोबत मिळून, त्यांच्या वाट्याला आलेली कोणतीही भूमिका टीम वर्कच्या जोरावर पूर्ण करुन दाखवू शकतात. एकटे, तुम्ही बलवान असाल, पण संघासह तुम्ही सर्वात बलवान आहात.

6. आयुष्य म्हणजे संघर्ष

आयुष्य एक सुंदर संघर्ष आहे, तुम्ही जसजसे मोठे व्हाल तसतसा संघर्ष वाढत जाईल. त्या संघर्षाचा आनंद घ्या. वडील हरिवंशराय बच्चन यांचे उदाहरण देत बिग बी अमिताभ बच्चन म्हणतात की, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत संघर्ष असतो. स्वीकार करा की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आणि प्रत्येक सेकंद हा सतत संघर्षाचा असेल आणि त्या संघर्षाशी लढण्यासाठी तुम्ही प्रत्येक दिवस तयार असाल. जेणेकरुन तुम्ही निवडलेल्या प्रत्येक कार्यात तुम्ही केलेल्या संघर्षाचे प्रतिबिंब पडेल.

7. तुमच्या चुकांमधून शिका आणि पुढे जा

अपयशाचा स्वतःचा अनुभव सांगून बच्चन म्हणतात की, सर्वजण चुका करतात, या चुका स्वीकारता आल्या पाहिजेत. कोणीही आपल्या चुका कधीच नाकारू नये. त्यापेक्षा त्यातून शिकावं. एखाद्याकडून काही चूक झाली तर आपल्याला त्याच्या कामाच्या पाठीशी उभेही राहता आले पाहिजे आणि त्याच्या प्रयत्नांचे कौतुकही करता आले पाहिजे.

8. यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही

कठोर परिश्रमाशिवाय यश मिळत नाही. मला भूमिका मिळाल्यावर त्यातून माझं सर्वस्व अर्पण मला करावंच लागतं. तेव्हाच यश बघायला मिळतं. कोणताही शॉर्टकट कष्टाला नाही. म्हणून कोणतीही तडजोड न करता यश मिळवण्यासाठी त्या कामाला आवश्यक ते सगळं द्या. तसंच मिळालेली संधी ओळखा, ती स्वीकारण्यासाठी पुरेसे नम्र व्हा, ती पुन्हा येणार नाही, असा सल्लाही ते देतात.

अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या या मूलमंत्रांमधून यश मिळवण्यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली असेल हे आपण समजू शकतोच. हे मूलमंत्र आपणही आपल्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करु. यश मिळवण्यासाठी आपल्याला त्याचा निश्चितच लाभ होईल.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat (GK_dnyan) वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button