यश मिळवून देणाऱ्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का? | 3 things you need to be successful

आपण एखादं ध्येय ठरवलं की ते पूर्ण व्हावं अशीच प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी कठोर मेहनत आपण घेत असतो. पण या मेहनतीबरोबरच आणखी तीन गोष्टी ध्येय गाठण्यासाठी महत्त्वाच्या असतात, ज्या आपल्याला पराभवापासून दूर ठेवून यश हमखास मिळवून देऊ शकतात. त्या तीन गोष्टी कोणत्या ते या पोस्ट मध्ये वाचा.

यश मिळवून देणाऱ्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का? | 3 things you need to be successful

1. विश बोन (Wishbone)

विश म्हणजे मराठीमध्ये इच्छा आणि बोन म्हणजे हाड. मराठीत याचा शब्दशः अर्थ आपण पाहिला तर इच्छाहाङ होतो आणि ते म्हणणं आपल्याला अतिशय विचित्र वाटू शकतं. त्यामुळे विशबोन असंच आपण या प्रकाराला म्हणू. तर विशबोन म्हणजे काय, तर तीव्र इच्छाशक्ती. आपली इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी हा प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे. आपलं लक्ष ध्येयापासून ढळू न देता ध्येयावरच केंद्रीत करण्यासाठी आपल्यात विशबोन महत्त्वाची भूमिका बजावतं. इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य नियोजन, दृष्टीकोन गरजेचा आहेच. आपल्याला आपलं भविष्य कसं हवं आहे, आयुष्य कसं हवं आहे या सगळ्याचा मार्ग विशबोनच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतो. तीव्र इच्छाशक्तीमुळे आपण आपल्या ध्येयापासून सहसा ढळत नाही. लक्ष विचलित होण्यापासून विशबोन आपल्याला दूर ठेवत असल्याने ध्येयपूर्तीसाठी मोठी मदत होते.

2. बॅक बोन (Backbone)

बॅक बोन म्हणजे पाठीचा कणा हे आपल्याला माहित आहेच. पण याला आपण स्वाभिमान असेही म्हणू शकतो. हा गुण आपल्या खोलवर रुजलेल्या मानसिक कणखरपणाचं आणि आपल्यातल्या लवचिकतेचं दर्शन घडवत असतो. आपली कोणतीही इच्छापूर्ती करण्यासाठी बॅकबोन हे अतिशय महत्त्वाचं माध्यम आहे. ध्येय, इच्छा पूर्ण करण्यासाठी जमिनीवर पाय रोवून उभं राहण्यासाठी, नम्रपणा दाखवण्यासाठी बॅक बोन महत्त्वाचा असतो. अडचणीच्या काळातही ताठ उभं राहून अडचणींचा सामना करण्याचा गुण आपण बॅकबोन प्रकारातून घेऊ शकतो. मानसिक आणि शारीरिक दोन्ही बाजूंनी बॅकबोन कणखर असणं अतिशय गरजेचं आहे. ज्या माणसाचा बॅकबोन हा गुण सुदृढ असेल, खरंच ज्याला पाठीच्या कण्याप्रमाणे ताठ आणि तितकंच लवचिक जगता येत असेल त्याला ध्येय पूर्ण करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

3. फनी बोन (Funny bone)

आपल्या आयुष्यात अनेकदा आपल्याला नको असलेल्या प्रसंगांचा सामना करावा लागतो. संघर्ष करावा लागतो. पण या संघर्षाचा ताण आपल्याला अगदी सहजपणे हाताळता आला पाहिजे. आपल्या विनोदी स्वभावातून ताणतणावाकडेही मजेशीर नजरेने बघता आलं पाहिजे. इतकंच काय तर स्वतःवर जोक मारणंही जमलं पाहिजे. तरच तणावमुक्त आयुष्य आपण जगू शकतो. आपल्या कठीण काळातही आनंदी ठेवण्याची ताकद म्हणजे फनी बोन अर्थात हसत खेळत जगण्याची वृत्ती. स्वतःवर हसणं आणि आत्ममग्न होण्याचं टाळणं या दोन्ही गोष्टी आयुष्यात हलकंफुलकं राहण्यासाठी गरजेच्या असतात. तसंच फनी बोन स्वभावगुण आपल्यात असेल तर आपण नेहमी आशावादी असतो.

संघर्षापुढे हार न मानता त्याच्यावर सहजपणे मात करण्याची ताकद आपला हा गुण आपल्याला मिळवून देतो. याबरोबरच भूतकाळात अडकून न पडता आणि भविष्याचा फार विचार न करता अशी माणसं वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे कोणत्याही तणावापासून मुक्त राहता येतं. हा स्वभाव ध्येयाच्या जवळ पोहोचवण्यासाठीही महत्त्वाचा ठरतो.

आपल्याला आयुष्यात यशस्वी करण्यासाठी हे तिन्ही ‘बोन’ प्रकार अतिशय महत्त्वाचे आहेत. तीव्र इच्छेला, कणखरपणा आणि तितक्याच मजेशीरपणाची साथ मिळाल्याने ध्येय गाठण्याचा प्रवास आनंदी, उत्साही होतो. तिन्ही गुणांचा उत्तम संगम साधत ध्येयाची वाटदेखील आपल्याला आनंदी वाटू शकते. ध्येयाचा तणाव न येता या तिन्ही गुणांमुळे तो एक सुंदर प्रवास असल्याची अनुभूतीही आपण मिळवू शकतो. त्यामुळे विशबोन, बॅकबोन आणि फनीबोन या तिघांचा विचार करुन ते आपल्यात भिनवण्याचा प्रयत्न आपण केला तर त्यातून आपलं हितच साधलं जाईल.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat (GK_dnyan) वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button