नमस्कार मित्रांनो, आज आपण 21 मार्च रोजी झालेल्या महत्त्वाच्या घटना,जन्मदिनवस,जयंती,वाढदिवस,मृत्यू, पुण्यतिथी आणि स्मृतिदिन हे सर्व माहित करुन घेणार आहोत.
21 March Dinvishesh – 21 मार्च जागतीक दिवस
- जागतिक कविता दिन
2. जागतिक कथपुटली दिन
3. आंतरराष्ट्रीय रंग दिन
4.राष्ट्रीय जंगल दिन
5. जागतिक मतिमंदत्व दिन
6.आंतरराष्ट्रीय जातिवादविरोध दिन
21 मार्च रोजी घडलेल्या महत्वाच्या घटना
1556 : ख्रिश्चन धर्मात सुधारणांची आवश्यकता आहे असे म्हणणारे आर्चबिशप थॉमस क्रॅनमर यांना शिक्षा म्हणून जिवंत जाळण्यात आले.
1680 : छत्रपती शिवाजी महाराजांनी कुलाबा रायगड किल्ल्याची बांधणी सुरू केली.
1858 : इंग्रज सेनापती सर ह्यू रोझ यांनी झाशीस वेढा दिला.
1871 : ऑटो वॉन बिस्मार्क हे जर्मनीचे चान्सलर बनले.
1935 : मोहम्मद रझा पेहलवी यांनी पर्शियाचे नाव ईराण करा असा अहवाल केला होता.
1977 : भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.
1980: अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.
1990 : नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.
2000 : भारताचा इन्सॅट 3 बी हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला.
2003: जळगाव महानगरपालीकेची स्थापना.
2006 : सोशल मीडिया ट्विटर वेबसाईटची स्थापना झाली.
21 मार्च – जन्मदिवस, जयंती आणि वाढदिवस
1768 : फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ फोरियर यांचा जन्म
1847 : कालजंत्रीकार बाळाजी प्रभाकर मोडक यांचा या दिवशी जन्म झाला.
1887 : थोर विचारवंत नेते मानवेंद्रनाथ रॉय यांचा जन्म झाला.
1916: भारतरत्न शहनाईवादक बिस्मिल्ला खान यांचा जन्म झाला.
1923 : सहज योगच्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु निर्मला श्रीवास्तव यांचा जन्म.
1978: अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा जन्म.
21 मार्च – मृत्यू, पुण्यतिथी आणि स्मृतीदिन
1973 : कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचे निधन.
1973 : नाटकाचा प्रयोग करत असतानाच नटवर्य शंकर घाणेकर यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं.
1985 : ब्रिटिश अभिनेता सर मायकेल रेडग्रेव्ह यांचे निधन.
2001: दक्षिण कोरियन ह्युंदाई मोटर कंपनीचे संस्थापक चुंग जू-युंग यांचे निधन.
2003 : भारतीय लेखक शिवानी यांचे निधन.
2005 : मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक, कथा लेखन व पटकथाकार दिनकर पाटील यांचे निधन.
2010 : खळखळून हसायला लावणारे ज्येष्ठ विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचे निधन.
Note – सर्वात पहिले मित्रानो ही माहिती पुस्तकातून आणि इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.