टी-20 विश्वचषक 2021 या स्पर्धेचे बिगुल 17 ऑक्टोंबर पासून वाजले आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असले तरी या स्पर्धेचे आयोजन भारताने कोरोना महामारीच्या व तिसऱ्या लाटेच्या धास्तीने संयुक्त अरब अमिराती आणि ओमान (UAE)मध्ये आयोजित केले आहे. 2007 पासून सुरू झालेल्या आधुनिक व क्रिकेटच्या लोकप्रिय प्रकारात T20 च्या सामावेश होतो. 2007 पासून टी20 विश्वचषक स्पर्धेचे सुरुवात झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत 5 वेळा ही स्पर्धा खेळवण्यात आली आहे.
USE मध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी आयसीसीने नियमावली जाहीर केली आहे | 2021 T20 World Cup format, rules, venues, prize money
- प्रथमच टी-20 विश्वचषक स्पर्धेत डिसिजन रिव्ह्यू म्हणजेच डीआरएस चा वापर होईल. आयसीसीने ही पद्धत वापरण्यास परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे प्रत्येक संघाला प्रत्येक डावात 2-2 रिव्ह्यू मिळतील. म्हणजेच दोन्ही संघाच्या कर्णधाराला डाव्यादरम्यान दोन वेळा मैदानावरील अम्पायरच्या निर्णयाला आव्हान देण्याचा अधिकार असेल.
- गतवर्षी जूनमध्ये कोरोनादरम्यान अनेक सामन्यात अनुभवी पंचांची गैरहजेरी पाहता आयसीसीच्या कौन्सिलिंग ने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात एक अतिरिक्त रिव्ह्यू वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
- UAE मध्ये आयोजित या विश्वचषकात सामना होण्यास पावसामुळे उशीर होत असल्यास सामन्यातील पष्टकाची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
- साखळी फेरी दरम्यान संघाला कमीत कमी 5 षटके फलंदाजी करावी लागेल. तेव्हाच निकालासाठी डकवर्थ- लुईस नियमाचा वापर केला जाईल. तसेच हा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी लागू असेल.
- टी20 विश्वचषकातील उपांत्य व अंतिम सामना बाधित झाल्यास, षटकाची मर्यादा वाढवून 10 केली जाईल.
- आयसीसीने स्पर्धेतील प्रत्येक सामन्यादरम्यान ड्रिंक्स ब्रेक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अडीच मिनिटांचा हा ब्रेक अर्धा डाव संपल्यावर घेण्यात येणार आहे.
- यूएई मध्ये आयोजित या विश्वचषकात उपांत्य व फायनल सांगण्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे.
- यूएई मध्ये आयोजित या विश्वचषकात विजेत्या संघाला जवळपास 12 कोटी रुपये मिळतील. तर उपविजेत्याला 6 कोटी रुपये दिले जातील.
- उपांत्य फेरीत पराभूत संघाला 3-3 कोटी रुपये देण्यात येईल.
- आयसीसी सुपर 12 च्या प्रत्येक विजयावर बोनस देखील देणार आहे असे 2016 च्या विश्वचषक देखील केले होते सुपर-12 च्या एकूण 30 सामन्यात जवळपास 9 कोटी रुपये बक्षीस वाटप केले जाईल.
- तसेच यूएई मध्ये आयोजित या विश्वचषकात 42 वर्ष क्रिस गेल सर्वात वयस्कर खेळाडू आहे. तर अफगाणिस्तान चा यष्टिरक्षक गुरबाज सर्वात युवा खेळाडू आहे. त्याचे वय अवघे 19 वर्ष आहे.
- UAE मध्ये आयोजित या विश्वचषकात 6 खेळाडू आपल्या कारकिर्दीतील सातवा विश्वचषक खेळत आहेत. यामध्ये रोहितसह, शाकिब, गेल, ब्रावो, रहीम, महमुद्दुलाचा समावेश आहे.
- T20 च्या या लोकप्रिय प्रकारात पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने सर्वाधिक बळी मिळविले आहेत. त्यांनी विश्वचषकातील 34 सामन्यात 39 बळी घेतले आहेत.
- त्याचप्रमाणे फलंदाजीत श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू महिला जयवर्धने सर्वाधिक धावा काढण्यात आघाडीवर आहे. त्याने विश्वचषकातील 31 सामन्यात 1016 धावा काढल्या आहेत. त्यामध्ये 6 अर्धशतकांची व 1 शतकांची नोंद आहे.
- 2007 मध्ये पहिल्यांदा दक्षिण आफ्रिका टी20 विश्वचषक आयोजित केला होता. त्यानंतर 2009 मध्ये इंग्लंड, 2010 वेस्टइंडीज, 2012 मध्ये श्रीलंका, 2014 मध्ये बांगलादेश आणि 2016 मध्ये भारतात T20 विश्वचषक आयोजण्यात आला होता.या 6 वर्षांमध्ये टी-20 विश्वचषकाला 4 वेगवेगळे विजेते लाभले आहेत. वेस्टइंडीज या एकमेव देशाने या स्पर्धेचे दोनदा विजेतेपद पटकावले आहे.
Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.