हे हेल्पलाईन क्रमांक खूपच उपयुक्त आहेत | List of numbers to contact during emergency

एक काळ असा होता जेव्हा माणसांची संख्या कमी होती पण माणूस हाकेच्या अंतरावर असायचा. कोणाला काही दुखलं खुपलं, आग लागली, अपघात झाला, कोणी एखाद्या गटारात किंवा लिफ्टमध्ये अडकलं, मारहाण होताना पाहिलं, चोरी झाली, हत्या झाली तर आसपासचे लोक संबंधित यंत्रणेला कळवून मदत घेऊ शकत होते. पण आता जग जवळ आलं तशी माणसं दुरावली आणि त्यासोबतच समस्या सुद्धा वाढल्या काही समस्या ह्या आधीपासून होत्याच. त्यांच्यावर ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे असं बोललं जात होतं. म्हणून त्या सोबतच इतर नवीन उद्भवणाऱ्या समस्यांवर सुद्धा उपाय करणं यंत्रणांसाठी आवश्यक झालं.

यावर हेल्पलाईन क्रमांक हा एक अत्यंत साधा, सर्वांना जमेल असा उपाय सर्व जगात राबवला जाऊ लागला. सर्वात जवळचं संपर्काचं माध्यम म्हणजे फोन या फोनवरून संबंधित यंत्रणेला फोन केल्यास त्यांची तात्काळ मदत मिळू शकते. मोबाईल येण्याआधी लँडलाईन आणि एक रुपया टाकून करायचे फोन ज्याला पब्लिक कॉल ऑफिस म्हणजे पीसीओ म्हणतात, त्यांच्या माध्यमातून हे कॉल्स करून मदत घेतली जायची. पीसीओ हा त्यावेळी गल्लीबोळात आणि अनेक दुकानांवर लावलेला असायचा. त्यामुळे झोपडपट्टीत होणाऱ्या अनेक दुर्घटनांची सूचना यंत्रणांना मिळायची. लहान मुलं ही बरेचदा कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करायची. त्यांच्यासाठी ही पीसीओ सेवा तर वरदान ठरली आहे.

अनेक मुलांनी चाईल्डलाईनच्या 1098 ह्या क्रमांकावर संपर्क साधून मदत मागितली आहे. अशा प्रकारे घरगुती हिंसाचार, आग लागली, तातडीने रुग्णवाहिका हवी असल्यास अशा अनेक कारणांसाठी हे हेल्पलाईन क्रमांक वापरता येत होते. आज मोबाईल आल्यामुळे हे अधिक सोयीस्कर झालं आहे. सर्व नंबर आपल्याला आधीच सेव करून ठेवता येतात शिवाय जीपीएसमुळे लोकेशन्स पाठवू शकत असल्यामुळे यंत्रणांना घटनास्थळी पोहोचणं अधिक सोपं झालं आहे. या एकेका क्रमांकावर अनेक फोन सुरु असतात आणि तितकेच त्यांचे ऑपरेटर सुद्धा असल्यामुळे जवळ जवळ सर्व कॉल्सना उत्तरे दिली जातात.

हेल्पलाईन क्रमांक हे प्रामुख्याने मदत मागवण्यासाठी असतात. कोणत्याही नागरिकाला आवश्यकता भासल्यास या क्रमांकावर संपर्क साधून मदत मागवता येते. मदतीसाठी असणारे हे संपर्क क्रमांक एकाहून अधिक असू शकतात. जसे, की रुग्णवाहिका बोलवायची असल्यास वेगळा संपर्क क्रमांक, पोलिसांना बोलावयाचे आल्यास वेगळा. काही मदत क्रमांक हे मोफत असतात. काहींसाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. उदा, अग्निशमन दलासाठी केलेला कॉल आणि बँकेत केलेला कॉल.

काही मदत क्रमांक हे विशिष्ट घटनेसाठी निर्माण केले जातात. करोना काळात मदतीसाठी असणारे संपर्क क्रमांक याचं उत्तम उदाहरण ठरू शकतात. काही संपर्क क्रमांक अगदी लहान असतात तर काही दहा अंकी. उदा. महानगर गॅस पाईप लीकसाठी असणारा मदत क्रमांक आणि एनडीआरएफचा संपर्क क्रमांक. भारतात असणाऱ्या काही मदत संपर्क क्रमांकाची आपण ओळख करून घेऊया. 2019 पासून 112 हा क्रमांक सर्व प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत वापरता येणार संपर्क क्रमांक आहे. ह्या एकाच क्रमांकावर कॉल करून आपण मदत मागू शकता. पण ही सेवा सर्व देशात लागू होत नाही तोपर्यंत खालील क्रमांक आपण वापरू शकता.

हे हेल्पलाईन क्रमांक खूपच उपयुक्त आहेत | List of numbers to contact during emergency

आपत्कालीन परिस्थिती:

  • राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक: 112
  • अग्निशमन दल: 101
  • रुग्णवाहिका: 102
  • आपत्ती व्यवस्थापन: 108
  • पोलीस: 100

महिला, वृद्ध आणि मुलांसाठी :

  • महिलांसाठी मदत क्रमांक: 1091
  • घरगुती शोषण झाल्यास:181
  • हरवलेल्या मुलं आणि महिलांसाठी: 1094
  • जेष्ठ नागरिकांसाठी: 14567
  • कठीण परिस्थितीत असणाऱ्या मुलांसाठी: 1098

माहिती:

  • रेल्वे माहिती :139
  • किसान कॉल सेंटर: 1551
  • पर्यटकांसाठी: 1363 किंवा 1800111363

गुन्हाः

  • सायबर क्राईम: 155620
  • वाहतूक पोलीस: 103
  • भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाइन: 1031

अपघात:

  • हवाई अपघात: 1071
  • रेल्वे अपघात: 1072
  • रस्ता अपघात: 1073

मन की बात:

  • मन की बातसाठी कल्पना आणि सूचना: 1800-11-7800
  • मन की बात ऐकण्यासाठी: 1800-3000-780

करोना काळात:

  • केंद्रीय मदत क्रमांक: +91-11-23978046

या व्यतिरिक्त प्रत्येक राज्य निहाय संपर्क क्रमांक देखील उपलब्ध आहेत.

राष्ट्रीय संस्था:

  • आधार कार्डासाठी: 1947
  • निवडणूक आयोग:1950
  • इंडियन ऑईल हेल्प लाईन: 155233
  • एलआयसी ऑफ इंडिया: 1251

तक्रार:

  • विजेसंबंधी तक्रारी: 155333
  • एसटीडी : 1582
  • टेलेक्स: 1589
  • फोन माहिती : 1600
  • बिलसंदर्भात तक्रारी: 166 / 1660-69
  • बिल तक्रार केंद्र: 1671/73

एड्स:

  • एड्स हेल्पलाइन: 1097
  • एड्स हेल्प लाईन सेवा: 1097

इतके क्रमांक आपण लक्षात ठेऊ शकत नाही. यामुळे एकच क्रमांक ठेवण्याचा प्रयत्न 2019 मध्ये फलद्रूप झाला आणि देशाला 112 हा क्रमांक मिळाला. पण आपल्या देशात ही सेवा सर्वदूर अजून पोहोचलेली नाही. अमेरिकेत एकच क्रमांक असण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. आपल्याकडे जसा पोलीस नियंत्रण कक्ष असतो आणि तिथे आपण 100 ह्या क्रमांकावर फोन केल्यास ते आपली केस संबंधित विभागाला कळवतात, हाच प्रकार अमेरिकेत आहे. तिथे 911 हा एकच क्रमांक आहे. तिथे आलेले कॉल्स हे नंतर त्या त्या विभागात ट्रान्स्फर केले जातात आणि लोकांना मदत पोहोचते. ह्या क्रमांकाची अमेरिकन लोकांना इतकी सवय आहे की लहान मुलं आपली गणितं सोडवून देण्यासाठी सुद्धा त्यांना कॉल करतात! गंमतीचा भाग बाजूला ठेऊया. पण आपल्या देशात सुद्धा 112 हा क्रमांक आहे. फक्त याविषयी ना जनजागृती झाली ना तो क्रमांक तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावा, त्यासाठी तंत्रज्ञान तिथपर्यंत पोहोचवावं असे प्रयत्न झालेत. याचीच परिणीती म्हणून आपण बातम्यांमध्ये पाहिलं की अनेक लोक आपल्या नातेवाईकांना रुग्णालयात आपल्या पाठीवरून, सायकल वरून किंवा हातगाडीवरून घेऊन जात होते. हा क्रमांक शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल तेव्हा खेडोपाड्यात तंत्रज्ञान पोहोचलं असं आपण म्हणू शकू.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.

Sharing Is Caring:

मित्रांनो तुम्हाला या वेबसाइटवर Career tips, success stories biography, general knowledge, Health tips, Tech Tips, ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्या गोष्टी आपण जाणून घ्यायला पाहिजे त्याबद्दलच ज्ञान. आणि बरच काही तुम्हाला देण्याचा प्रयत्न ज्ञानशाळा टीम करत आहे.

Leave a Comment

close button